पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात 'या' हिरव्या शेंगा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा कायमच हेल्दी आणि फिट आहेत.जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये मोदी कायमच दौरा करतात. पण तरीसुद्धा ते फिट आहेत. नरेंद्र मोदी कायमच त्यांच्या फिटनेस आणि आहाराकडे विशेष लक्ष देतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसचे जगभरात सगळीकडे चाहते आहेत. त्यांच्या फिटनेसची सगळीकडे जोरदार चर्चा असते. नरेंद्र मोदी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी योगासने करून दिवसाची सुरुवात करतात. त्यानंतर गरम पाण्याचे सेवन आणि हर्बल ड्रिंकचे सेवन करून नाश्त्यात पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. दैनंदिन आहारात ताज्या फळांचे आणि पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे ते कायमच हेल्दी दिसतात. नरेंद्र मोदींना आवडणारी भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा. त्यांना आहारात शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेला पराठा खायला खूप जास्त आवडतो. या पराठ्याचे ते आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सेवन करतात.(फोटो सौजन्य: Pinterest)
Baba Ramdev यांनी दिला मुलांना Genius बनविण्याचा सोपा उपाय, कॉम्प्युटरप्रमाणे धावेल मेंदू
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहे. दक्षिण भारतीय लोक प्रामुख्याने आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करतात. या शेंगांचा वापर करून सूप, सांबार आणि भाजी, शेवगा फ्राय इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामध्ये जीवनसत्त्व अ, ब१, ब२, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, फळे इत्यादी प्रत्येक गोष्टीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. शेवग्याच्या बियांपासून काढलेले तेल पोटाला लावल्यास सूज कमी होऊन अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय पोटाच्या सर्वच समस्या दूर होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित शेवग्याची पाने चावून खाल्यास कर्करोगापासून शरीराचे रक्षण होईल. बद्धकोष्ठता, पोटातील आम्ल कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले जाते. याशिवाय नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात शेवग्याच्या शेंगांचे किंवा शेवग्याच्या पावडरचे कोमट पाण्यातून सेवन करावे.
यकृतामध्ये जमा झालेल्या हानिकारक पेशी नष्ट करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यासोबतच रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे गरम पाण्यासोबत सेवन करावे. दमा आणि श्वसनमार्गातील जळजळ कमी करण्यासाठी शेवग्याची पाने प्रभावी ठरतात. यामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचा गुणकारी घटक आढळून येतो, ज्यामुळे डोळ्यांचे आजार होत नाही. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठो शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे.