रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी
हल्ली आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या वाढू लागतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव,सतत जंक फूडचे सेवन, अपचन इत्यादीमुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे लिव्हर, किडनी आणि रक्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. रक्तात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला अनेक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नेहमीच शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या फुलांचा चहा नियमित प्यावा? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फुलांचा चहा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवून देईल.(फोटो सौजन्य – istock)
सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले उपलब्ध असतात. झेंडूच्या फुलांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय झेंडूची फुल आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरतात.ही फुले आधिककाळ व्यवस्थित टिकून राहतात. झेंडूची फुले लवकर खराब होत नाहीत. झेंडूच्या फुलांचा वास काहींना आवडत नाही. पण ही फुले आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी ठरतात. झेंडूच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करून त्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या झेंडूच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या फुलांचा वापर करावा.
वारंवार आहारात तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचनाची समस्या कायमच उद्भवते. अशावेळी झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचेवर चमकदार ग्लो येतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, पुरळ, खाज आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी झेंडूची फुले प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेचा हानिकारक पेशींपासून बचाव करतात.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात चांगले आणि योग्य प्रमाणात रक्त असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण रक्त खराब झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे झेंडूच्या चहाचे सेवन करावे. यामुळे चेहऱ्यावर येणारे फोड आणि मुरूम लवकर बरे होतात. याशिवाय साथीच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी झेंडूच्या चहाचे सेवन करावे.
झेंडूच्या फुलांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराच्या कोणत्याही अवयवाला आलेली सूज कमी होते. याशिवाय दातदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.