Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Piles Problem: दीर्घकाळ बसून काम करणे आणि हालचालींचा अभाव, नोकरदारांमध्ये वाढतोय मूळव्याधीचा धोका

आजकाल अनेक लोक तासन्‌तास कार्यालयात बसून काम करत असल्यामुळे डॉक्टरांना नोकरदारांमध्ये मूळव्याधीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नक्की याची कारणे काय आहेत याबाबत अधिक माहिती घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 22, 2026 | 05:35 PM
पाइल्सची समस्या का वाढत आहे (फोटो सौजन्य - iStock)

पाइल्सची समस्या का वाढत आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • नोकरदार व्यक्तींमध्ये वाढतोय पाइल्स 
  • बैठी जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कमी पाणी पिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे ही समस्या वाढत आहे
  • तज्ज्ञांनी काय सांगितले, जाणून घ्या 
पूर्वी मूळव्याध (Piles) ही समस्या मुख्यतः वयस्कर लोकांमध्ये दिसून येत होती. मात्र आता ही समस्या मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि काम करणाऱ्या तरुणांमध्येही आढळत आहे. दीर्घकाळ बसून काम करणे, पुरेशी हालचाल न करणे, अयोग्य आहार घेणे तसेच गुदद्वाराजवळ होणारी खाज, जळजळ, अस्वस्थता किंवा शौचाच्या वेळी रक्त येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. 

तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत काही सोपे बदल करून आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही समस्या टाळता येऊ शकते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशा कार्यालयीन वेळेत सतत बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Piles: ना चिरफाड ना ऑपरेशन, मूळव्याधाची समस्या 15 दिवसात छुमंतर, Ayurvedic डॉक्टराचा देशी जुगाड

काय सांगतात तज्ज्ञ

अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील जनरल सर्जन डॉ. किरण कुमार जाधव म्हणाले की, “अनेक कर्मचारी दररोज आठ ते दहा तास किंवा त्याहून अधिक वेळ खुर्चीवर बसून काम करतात. जास्त वेळ बसून राहिल्यामुळे गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि त्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अभाव, बद्धकोष्ठता आणि व्यायाम न करणे यामुळे हा धोका आणखी वाढतो. 

काम करणाऱ्या लोकांमध्ये मूळव्याधीच्या रुग्णांची संख्या जवळपास ६० टक्क्यांनी वाढली आहे. दर महिन्याला ३० ते ४५ वयोगटातील १० पैकी सुमारे ६ कार्यालयीन कर्मचारी गुदद्वाराजवळ अस्वस्थता, खाज, वेदना, शौचाच्या वेळी रक्त येणे, सूज येणे किंवा शौच पूर्ण न झाल्यासारखे वाटणे अशा तक्रारी घेऊन येतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास सतत वेदना होणे, वारंवार रक्तस्त्राव होणे, शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणे आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.”

मूळव्याध कसा टाळता येईल?

डॉ. जाधव पुढे म्हणाले, “जीवनशैलीत काही साधे बदल करून मूळव्याध टाळता येऊ शकते. फळे, भाज्या, सॅलड आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा. जंक फूड, जास्त तिखट पदार्थ आणि डबाबंद अन्न टाळावे. दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि शौचाच्या वेळी जास्त ताण द्यावा लागत नाही. प्रत्येक तासाला थोडे चालणे, दीर्घकाळ बसून न राहणे, नियमित व्यायाम करणे आणि शौचाची इच्छा झाल्यावर ती दाबून न ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजाराची तीव्रता समजू शकते आणि पुढील गुंतागुंत टाळता येते. आजकाल कमी वेदनादायक आणि आधुनिक उपचार उपलब्ध असून त्यातून रुग्ण लवकर बरे होऊ शकतात.”

घरगुती उपाय केल्याने ३ दिवसात बरा होईल मूळव्याध, जुनाट बद्धकोष्ठता होईल बरी

Web Title: Prolonged sitting and lack of physical activity risk of piles rising among working professionals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news in marathi
  • piles

संबंधित बातम्या

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
1

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.