Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोरायसिस नक्की का होतो? लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Psoriasis Symptom and Prevention: सोरायसिस हा एक ऑटोइम्युन (जेव्हा शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच शरीरातील पेशींवर हल्ला चढवते तेव्हा होणारे आजार) आजार आहे. याचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. आनुवंशिक तसेच पर्यावरणात्मक घटक पॅथोजेनेसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. सोरायसिस संसर्गजन्य नाही.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 29, 2024 | 11:20 AM
सोरायसिस म्हणजे काय

सोरायसिस म्हणजे काय

Follow Us
Close
Follow Us:

सोरायसिसमुळे व्यक्तीच्या जीवन गुणवत्तेवर लक्षणीय विपरीत परिणाम होतात. आपल्या शरीराविषयी घृणा वाटणे, आत्मविश्वास खचणे, कलंक, स्वतःच्या दिसण्याविषयी लाज, संकोच वाटणे अशा अनेक समस्यांना सोरायसिस रुग्णांना सामोरे जावे लागते. सोरायसिस सहज लक्षात येतो आणि बहुतांश रुग्णांच्या बाबतीत काही सध्या टॉपिकल औषधांनी व जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणून तो नियंत्रणात ठेवता येतो. 

डॉ. रेश्मा विश्नानी, कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, त्रिकोलॉजिस्ट आणि एस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती देत जागरूकतेचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाला बेसिक लक्षणे आणि उपचाराबाबत योग्य माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock) 

कसे आहेत उपाय

सोसायसिस असल्यास काय करावे

सोरायसिसवरील उपचारांमध्ये तोंडावाटे घेण्याचे स्टिरॉइड्स क्वचितच दिले जातात आणि ते देखील फक्त काही दिवसांसाठी व फक्त काही दुर्मिळ केसेसमध्येच दिले जातात, त्यामुळे तुम्हाला जी औषधे देण्यात आली आहेत त्याची नीट माहिती करून घ्या. तोंडावाटे घेण्याची स्टिरॉइड्स फक्त काही दुर्मिळ केसेसमध्येच दिली जातात पण स्टिरॉइड्सचे टॉपिकल क्रीम ऍप्लिकेशन हा सोरायसिसवरील प्रमुख उपचार असतो, पण हा उपचार देखील सुरुवातीचे काही महिनेच केला जातो. यासाठी तज्ज्ञ आणि पात्र डॉक्टरकडूनच उपचार करून घ्या.

हेदेखील वाचा – सोरायसिस लक्षणे आणि कारणे काय ते जाणून घ्या

नेमके कारण काय?

सोरायसिसचे नेमके कारण जरी अद्याप समजलेले नसले तरी असे अनेक घटक आहेत ज्यामुळे सोरायसिस वाढू शकतो, त्यांना प्रतिबंध केला जाऊ शकतो. 

  • ताणतणाव: ताणतणाव आणि अति विचार यामुळे सोरायसिस वाढू शकतो, त्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अर्थात बोलणे सोपे पण करणे कठीण असते, तरी ते केले पाहिजे.
  • स्थूलपणा: वाढलेला बीएमआय, आरोग्याला अपायकारक जीवनशैली आणि वजनात वाढ या गोष्टींचा थेट प्रभाव सोरायसिसवर होतो
  • अल्कोहोलचे अति सेवन: यामुळे सोरायसिस वाढतो. तसेच सोरायसिससाठी जर तोंडावाटे काही औषधे घेत असाल तर अल्कोहोल सेवन पूर्णपणे थांबवले पाहिजे
  • थंड हवामान: हवामानातील बदलांचा प्रभाव सोरायसिसवर होतो. भारतामध्ये असे दिसून आले आहे की, हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या आधी सोरायसिस वाढतो
  • आघात: त्वचेला कोणत्याही प्रकारचा, एपिडर्मिसला इजा करणारा आघात इजा झाल्याच्या ठिकाणी ऍक्टिव्ह लेसन्सना प्रवृत्त करू शकतो. याला कोबेनर फिनोमेनन असे म्हणतात आणि सोरायसिस सक्रिय असलेल्या केसेसमध्ये हे खूप प्रमाणात दिसून येते
  • सूर्यप्रकाश: बहुतांश केसेसमध्ये सूर्यप्रकाश, कमी प्रमाणात संपर्कामुळे सोरायसिसमध्ये सुधारणा होते पण 5% रुग्ण असे असतात ज्यांच्या लेसन्स वाढू शकतात. अनेक सोरायसिस रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्व कमी असते आणि त्यावर उपाय केल्याने सोरायसिसवरील उपचारांमध्ये मदत मिळते
  • आंतरवर्ती संसर्ग: श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला होणारा संसर्ग हा सोरायसिसचा सर्वसामान्य ट्रिगर आहे. या संसर्गांवर योग्य ते उपचार केले गेले पाहिजेत
  • औषधे: काही वेदनाशामक औषधे आणि रक्तदाबावरील औषधे यासारख्या काही औषधांमुळे सोरायसिस वाढू शकतो. तुम्ही नुकतीच काही नवी औषधे सुरु केली असतील व त्यामुळे सोरायसिस लेसन्समध्ये वाढ दिसून येत असेल तर तुमच्या डॉक्टरच्या निरीक्षणास आणून द्या
थोडक्यात, सोरायसिस हा एक ऑटोइम्युन आजार आहे, ज्याचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. वरील घटक सोरायसिसला वाढवू शकतात आणि त्यामुळे ते टाळले पाहिजेत. 

हेदेखील वाचा – सोरायसिस आणि मानसिक आरोग्‍य : तज्ज्ञांचा प्रभावी व्‍यवस्‍थापनासंदर्भात सल्‍ला

काय करावे आणि काय टाळावे

काय करणे टाळावे आणि कशा पद्धतीने काळजी घ्यावी

सोरायसिसवरील उपचारांमध्ये अनेक टॉपिकल आणि तोंडावाटे घेण्याची औषधे असतात पण मॉइश्चरायजर्स खूप महत्त्वाची असतात, रुग्णांनी माईल्ड क्लिंजर किंवा साबण वापरावा आणि दिवसातून दोनदा त्वचा मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. शरीरावर कोणताही स्क्रब किंवा लुफा वापरू नये. केसांसाठी नारळाचे तेल लावावे, केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावावे. कोल टार बेस्ड शाम्पू वापरावा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस धुवावेत. या उत्पादनांची निवड करण्याच्या आधी डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या.

Web Title: Psoriasis symptom and prevention from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
1

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
2

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
3

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण
4

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.