भारतीय रेल्वे आता अडवान्स होत चालली आहे. नवनवे कोच त्यात समाविष्ट होत आहे. प्रवाश्यांना केवळ एका जागेवरुन दुसर्या जागेवर नेणे एवढाच हेतू नसून त्यांचा प्रवास सुखद आणि मनोरंजक व्हावा असाही एक हेतू असतो.
मध्य रेल्वे झोनने पाचवा व्हिस्टोडियम कोच आणला आहे. रेल्वेच्या वतीने हा डबा पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ट्रेन क्रमांकः १२०२६/१२०२५ मध्ये बसवण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे या विस्टोडियम कोचमधून प्रवास करताना निसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटू शकतो. येत्या काही दिवसांत आणखी काही गाड्यांमध्ये अशा डब्यांची सुविधा सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.आरसे आणि रुंद खिडक्यांच्या फलकांमुळे प्रवासात मज्जाच मज्जा येते. या कोचमध्ये तुम्ही सीट्स ३६०-डिग्री व्ह्यूमध्ये फिरवू शकता.
या ट्रेनमध्ये प्रवाशांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद लुटता येईल. या प्रकारच्या डब्यातून प्रवास करण्याची मजाच वेगळी असते. या कोचमध्ये एलईडी लाईट, फिरता येण्याजोगे आणि पुशबॅक चेअर, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर, वाइड साइड स्लाइडिंग डोअर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
या सगळ्या आनंद घेण्यासाठी तुम्हा यातून एकदा तरी प्रवास करावा लागेल, आणि नक्कीच तुम्ही तो अनुभवा…