Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामनवमीचा उत्सव देशभरात कोणकोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? काय आहे परंपरा

हिंदू धर्मातील एक सण म्हणजे रामनवमी. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा उत्सव रविवार, 6 एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 05, 2025 | 11:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतानुसार, या दिवशी अयोध्येच्या राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात.

रामनवमीच्या दिवशी मठ आणि मंदिरामध्ये यज्ञ आणि नर नारायण सेवा केली जाते. या दिवशी घरी पूजा आणि यज्ञ केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. माता सीतेला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. भगवान रामासोबत सीतेची उपासना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात ऐश्वर्य वाढते, अशी मान्यता आहे.

रामनवमी देशात कुठे कुठे साजरी केली जाते

अयोध्या

अयोध्या येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. अयोध्येतील रामजन्मोत्सव पाहणे हे सर्वांत मोठ आकर्षण असते. यासाठी भाविक लाखो संख्येने अयोध्येला रवाना झालेले पाहायला मिळतात. अयोध्येच्या मंदिरात आकर्षक अशी सजावटही केली जाते. तर दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यटिळक अरथात सूर्य़किरणाचा अभिषेक पाहणे रामनवमीचे सर्वांत मोठे आकर्षणअसते. साधारण 4 मिनिट रामाच्या मस्तकावर सूर्यकिरणाचा अभिषेक केला जातो.

Vastu Tips: घरामध्ये या दिशेला पक्षाचे चित्र लावणे असते शुभ

रांची

झारखंडची राजधानी रांची राममय झाली आहे. महावीर ध्वजाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. सर्वत्र रामजन्मोत्सवाची तयारी सुरु आहे. रांचीच्या मुख्य रस्त्यावर रामनवमीच्या उत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. रामनवमीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे झेंडे आलेले पाहायला मिळतात.

शिर्डी

रामनवमीचा उत्साह शिर्डीमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. शिर्डी साईबाबासंस्थानच्या वतीने 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातोय. यावेळी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी पायाने शिर्डीकडे मार्गस्थ होतात. यावर्षी 100हून अधिक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. गुढीपाडव्याच्याआधीपासूनच अनेक भाविक मुंबईतून पायी यात्रा करत शिर्डीत दाखल होतात. या उत्सवाला शतकांची परंपरा असून महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादीं राज्यांमधून पालख्या शिर्डीत येतात.

मुंबई-पुणे

राम नवमीच्या निमित्ताने मुंबई आणि पुण्यात विविध भागांमधून निघणाऱ्या सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुका हे आकर्षणाचा विषय मानला जातो. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते.

शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

जळगाव

जळगावमध्ये देखील राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मंदिरामध्ये कीर्तनाचे आयोजन केले जाते. तसेच प्रभु श्रीरामांच्या महाआरतीचे देखील आयोजन केले जाते. जळगावमधील सर्व मंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

मलकापूर

रामनवमीनिमित्त मलकापूरमध्ये भव्यशोभा यात्रेचे आयोजन केले जाते. तसेच इतरही सर्व मंदिरांमध्ये संस्थेच्या वतीने शोभायात्रेसह भजन, कीर्तन, प्रवचन, रामरक्षा स्तोत्र पठण असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Ram navami 2025 what traditions are celebrated in which places across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ
1

अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य
2

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 
3

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.