Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान ‘हनुमानाचं मंदिर’, इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन

Hanuman Temple : भारतात नाही तर या देशात हनुमानाचं दिव्य मंदिर वसलं आहे जे धार्मिक श्रद्धा आणि नैसर्गिक साैंदर्यासाठी फार लोकप्रिय आहे. इथे सुंदर पर्वतरांगा, चहाचे मळे आणि शांततामय वातावरणाचा अनुभव घेता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2026 | 09:00 AM
भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान 'हनुमानाचं मंदिर', इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन

भारतात नाही तर या देशात पर्वतांमध्ये वसलं आहे भगवान 'हनुमानाचं मंदिर', इथे घडते श्रद्धेचे अनोखे दर्शन

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेतील रामबोडा येथे वसलेले हनुमान मंदिर धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • असे मानले जाते की, हनुमानाने सीतेच्या शोधासाठी लंकेत आल्यावर सर्वप्रथम इथेच विश्राम केला होता.
  • हे मंदिर जुने नसून इथून जवळच सीता अम्मन मंदिरही वसलेले आहे.
भारतात धार्मिक स्थळांना अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो मंदिरे देशात वसली आहेत पण आज आपण एका अशा मंदराविषयी जाणून घेणार आहोत जे भारतात नाही तर श्रीलंकेत वसले आहे. हे मंदिर फार लोकप्रिय असून लोकांची धार्मिक श्रद्धा याच्याशी जोडलेली आहे. श्रीलंका हे देश नैसर्गिक सौंदर्य, पर्वत आणि चहाच्या मळ्यांसाठी विशेष करुन ओळखला जातो. श्रीलंकेचे भारतासोबतचे धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध त्याच्या सीमांच्या पलीकडेही विस्तारलेले आहेत ज्यामुळे इथे भारतीय परंपरेशी निगडित अनेक धार्मिक स्थळे आहेत. श्रीलंकेतील प्रमुख ठिकाणांपैकी एक म्हणजे रामबोडा येथील हनुमानाचे दिव्य मंदिर जे पर्वातांच्या कुशीत वसलेले आहे. हे मंदिर येथील शांतता, सुंदरता आणि धार्मिक श्रद्धेसाठी खास करुन ओळखले जाते. फक्त धार्मिक पर्यटन म्हणूनच नाही तर तुम्ही निसर्गाचा अद्भूत अनुभव घेण्यासाठीही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

श्रीलंकेत वसलेले हे भक्त हनुमानाचे मंदिर साधे असले तरी याचे साैंदर्य अद्वतीय आहे. मंदिरांच्या दरवाजांवर केलेले कोरीवकाम आणि सभोवतालचा नैसर्गिक परिसर याच्या भव्यतेत आणि सुंदरतेत आणखी भर घालते. येथे तुम्हाला विस्तीर्ण टेकड्या, घनदाट जंगल आणि हिरवीगार चहाची मळे पाहायला मिळतील. याचबरोबर दुरवर चमकणारे सरोवर आणि संध्याकाळच्या आकाशातील चैतन्यमय रंग या ठिकाणाला चित्रपटातील कोणत्या सुंदर दृष्याचे रुप देते.

मंदिराचे महत्त्व रामायणाशी जोडलेले…

प्राचीन लोकप्रिय महाकाव्य रामायणातही रामबोडा खोऱ्याचा उल्लेख केलेला आढळतो. असे सांगितले जाते की, जेव्हा हनुमान सीतेच्या शोधात लंकेत आले होते, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम याच ठिकाणी पाऊल ठेवले होते. समुद्र पार करून लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने याच ठिकाणी विश्राम केला होता. इथे विश्राम केल्यानंतर त्यांनी सीतेचा शोध पुढे चालू केला.

रामबोडा या नावाचा अर्थ

काही इतिहासकारांच्या मते, रामबोडा हे नाव ‘रामपडाई’ या तमिळ शब्दावरून घेण्यात आला आहे. रामबोडाचा अर्थ रामाचे सैन्य असा होतो. असे मानले जाते की, लंकेचा राजा रावणासोबतच्या युद्धापूर्वी भगवान रामाने या परिसरात आपले सैन्य जमवले होते.

Travel: एक असे मंदिर जिथल्या यज्ञ कुंडात देवी सतीने केले होते आत्मदहन, एकदा नक्की दर्शन करा

भक्त हनुमान मंदिर केव्हा बांधले गेले?

सांगण्यात येते की, हे मंदिर फार जुने नसून १९९९ मध्ये चिन्मय मिशनने याचे बांधकाम करण्यात आले होते. हे मंदिर श्रीलंकेच्या प्रसिद्ध डोंगराळ शहर नुवारा एलियाच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. या परिसरात विस्तीर्ण चहाचे मळे आणि थंड हवामान पाहायला मिळते. या जागी पोहचायचे असेल तर तुम्ही नानू ओया रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने येऊ शकतात आणि तेथून टॅक्सीने सहजपणे मंदिरापर्यंत पोहोचता येते.

सीता अम्मन मंदिर

इतकंच काय तर या मंदिरापासून काही अंतरावरच सीता अम्मन मंदिर वसले आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे सीतेला रामाने कैद करुन ठेवले होते. या मंदिरात सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती स्थिपित केलेल्या आहेत.

Web Title: Ramboda sri lanka hanuman temple travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • hanuman temple
  • Shrilanka
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
1

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
2

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
4

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.