(फोटो सौजन्य: X)
फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच
‘युनायटेड रिलॅक्स रो’ म्हणजे काय?
शिकागोमध्ये वसलेल्या ‘युनायटेड रिलॅक्स रो’ या नवीन इकाॅनाॅमी सीट्सची घोषणा केली आहे. या नवीन इकाॅनाॅमी सीट्समध्ये पायांना रेस्ट करण्यासाठी एडजस्टमंट फिचर बसवण्यात येणार आहे. हे रेस्ट्स ९०-अंशाच्या कोनात वरच्या दिशेने दुमडले जातात, ज्यामुळे आडवे होण्यासाठी किंवा अंग ताणण्यासाठी अधिक जागा मिळू शकेल. एअरलाइनने म्हटले आहे की, उत्तर अमेरिकेतील ही एक अशी पहिली कंपनी आहे जी पायांच्या आरामासाठी सीट्समध्ये हे फिचर देत आहे. असेही म्हटले जात आहे की, या महाद्वीपावर अशा प्रकरच्या डिजाईनच्या सीट्स बनवण्याचा अधिकार फक्त याच कंपनीकडे आहे.
‘युनायटेड रिलॅक्स रो’ का आवश्यक आहे?
“युनायटेडच्या लांब पल्ल्याच्या विमानप्रवासात इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक जागा आणि अधिक आराम मिळायला हवा, आणि हे आम्ही त्यांना देऊ शकण्याचा हा एक मार्ग आहे,” असे युनायटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी अँड्र्यू नोसेला यांनी म्हटले.
‘रिलॅक्स रो’ सीट्स कशा काम करतात?
इकॉनॉमी क्लासच्या ‘रिलॅक्स रो’ मध्ये तीन सीट्सची पूर्ण रांग असणार आहे. जेव्हा तीन लेगरेस्ट वर उचलले जातात तेव्हा तीन स्वतंत्र उभ्या सीट्सऐवजी ते एक गादीसारखा पृष्ठभाग तयार करतात, म्हणजेच सीटचे रुपांतर एक गादीत होते ज्यानर तुम्ही आरामदायी अनुभव घेऊ शकता. मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना, अधिक जागेच्या शोधात असलेल्या जोडप्यांना आणि जास्त खर्च करण्यास तयार असलेल्या एकल प्रवाशांना याचा नक्कीच फायदा होईल. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार बनवलेली गादी, ब्लँकेट, अतिरिक्त उशा आणि मुलांसाठी एक मऊ खेळणे देखील पुरवले जाईल. या सर्वच गोष्टींमुळे आता प्रवाशांच्या विमान अनुभवामध्ये मोठा बदल घडून येणार असल्याचे समजत आहे.
The entire row is alllllll yours. Welcome to United Relax Row, three adjacent United Economy seats with adjustable leg rests that can each be raised or lowered to create a cozy lie-flat space for stretching out… You’ll also get a mattress pad, blanket and two pillows. If… pic.twitter.com/Q6gcOuXbXo — United Airlines (@united) March 24, 2026
‘रिलॅक्स रो’च्या जागा केव्हा उपलब्ध होतील?
युनायटेडने सांगितले आहे की, २०२७ मध्ये प्रथमच ‘रिलॅक्स रो’ सीट्स सादर करण्याची त्यांची योजना आहे. २०३० पर्यंत २०० हून अधिक बोईंग ७८७ आणि ७७७ वाइडबॉडी विमानांमध्ये या सीट्स वेगाने तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विमानात १२ पर्यंत ‘रिलॅक्स रो’ विभाग बसवून, युनायटेड या सुविधेला लांब पल्ल्याच्या विमानांच्या ताफ्याचा एक सामान्य भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ काही मार्गांवरच नाही तर पुढे जाऊन सर्वच मार्गांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा विचार आहे.






