दिवाळीमध्ये फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित करा 'ही' आसने
दिवाळी उत्सावाला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. तसेच घरोघरी फराळ, नवीन कपडे, रांगोळी इत्यादी गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये सगळीकडे फटाके आणि दिव्यांची रोषणाई केली जाते. दिव्यांनी संपूर्ण अंगण भरून जाते. या दिवसांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाते. फटाक्यांच्या आवाजाने आणि धुराने प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोगयाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरात प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.(फोटो सौजन्य-istock)
ध्वनी किंवा हवा प्रदूषणात वाढ झाल्यानंतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडू लागते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीराचे करी बिघडून जाते. त्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणती आसन करावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: लठ्ठ माणसांमध्ये 20 टक्के अधिक Pancreatic Cancer चा धोका, अभ्यासात धक्कादायक खुलासा
खोल श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालू राहते. तसेच ज्या व्यक्तींना दमा किंवा अस्थमाचा त्रास असले अशांनी प्रदूषणामध्ये जाणे टाळावे. खोल श्वास घेतल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही. तसेच हा व्यायाम प्रकार केल्यामुळे फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते. खोल श्वास घेतल्यानंतर एका जागेवर शांत बसून राहा. त्यानंतर नकटाऊन दीर्घ श्वास घ्या.
फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित श्वासाचे व्यायाम प्रकार करावे. ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य निरोगी राहील आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. श्वास घेत राहिल्यामुळे शरीराच्या हालचाली सुरळीत होण्यास मदत होते. तसेच कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. प्रदूषणामुळे होणार श्वासांचे आजार होत नाहीत.
हे देखील वाचा: मूळव्याधीवर आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आठ्वड्यातभरात मिळेल आराम
संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित प्राणायाम करावे. प्राणायाम केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित प्राणायाम केल्यामुळे शरीराची श्वसनसंस्था मजबूत आणि निरोगी होण्यास मदत होते. यासाठी नाकातून श्वास घ्या आणि पुन्हा नाकातून वेगाने श्वास घेऊन सोडून घ्या.