लग्न टिकविण्यासाठी फॉलो करा 1-1-1-1 मॅरेज रूल
लग्न हा एक मोठा निर्णय आहे, लग्न करणे सोपे आहे मात्र ते निभावणे अत्यंत कठीण आहे. आयुष्यातील चढ-उतार हे लग्नानंतरच्या नात्यावर अनेक वेळा परिणाम करतात. इतकेच नाही तर काही लोक लग्नाचे बंधन हे वर्ष व्हायच्या आतही तोडतात. छोट्या छोट्या भांडणांमुळे लोकांना घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेणे भाग पडत आहे. अशा स्थितीत नातं घट्ट करण्यासाठी काय करावं याचा प्रत्येकजण विचार करतो.
आजकाल मॅरेज रूल्सची बरीच चर्चा आहे, ज्याला 1-1-1-1 मॅरेज रूल्स असे म्हणतात. बदलत्या काळानुसार त्याचा ट्रेंड वाढत आहे आणि आजच्या जीवनात आवश्यकही ठरत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या या नियमाबद्दल सर्व काही सांगत आहोत. हा नियम प्रत्येक जोडपे फॉलो करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि आपलं लग्न अधिक काळ टिकविण्यासाठीही याची मदत होऊ शकते. रिलेशनशिप तज्ज्ञ अजित भिडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
1-1-1-1 मॅरेज रूल्स काय आहे?
नातं टिकविण्यासाठी काय आहे नवा नियम
सर्वप्रथम तुम्हाला या नियमात 1-1-1-1 चा अर्थ काय आहे हे माहीत असले पाहिजे. वास्तविक, प्रत्येक 1 चा अर्थ वेगळा आहे. जसे की 1 आठवड्यात एक डेट नाईट, 1 महिन्यात एक लाँग डेट, दर आठवड्याला इंटिमेट कनेक्शनसह शारीरिक संबंध आणि एकदा दीर्घकालीन सुट्टीचे नियोजन. त्याचा उद्देश वैवाहिक जीवन आनंदी करणे आणि एकमेकांना जवळ घेणे आणि नातं अनुभवणं असा आहे.
हेदेखील वाचा – पती – पत्नीच्या नात्यात ‘वो’ ठरतेय नोकरी, असे सांभाळा नातं दुरावा करा दूर
आठवड्यातून एकदा डेट नाईट
आठवड्यातून एकदा तरी असावी डेट नाईट
अनेक वेळा जोडप्यांना त्यांच्या व्यस्त जीवनात एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे, तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी डेटवर जायला हवे. यामध्ये आपल्याला दैनंदिन समस्यांपासून दूर राहावे लागेल आणि एकमेकांसोबत दर्जात्मक वेळ घालविण्याची गरज आहे. यादरम्यान तुम्ही फोन, टीव्ही आणि अन्य गोष्टींपासून दूर राहून केवळ आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणे गरजेचे आहे.
शारीरिक संबंध अर्थात फिजिकल इंटिमसी
शारीरिक संबंधही गरजेचे
1-1-1-1 विवाह नियमात आठवड्यातून एकदा तरी तुमचे शारीरिक संबंध असणे वा फिजिकल इंटिमसी असणे नात्यासाठी आवश्यक आहे. सुखी जीवनासाठी ते खूप महत्त्वाचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी शारीरिक जवळीक साधण्यास प्राधान्य द्या. यामुळे जोडपे एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांचे प्रेमही वाढते. अनेकदा शब्दातून ज्या गोष्टी कळत नाहीत त्या स्पर्शातून कळतात आणि नातं अधिक घट्ट होण्यास मदत मिळते
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
महिन्यातून 1 लाँग डेट
महिन्यातून एकदा एकमेकांना वेळ द्यायला हवा
या नियमानुसार, तुम्हाला महिन्यातून एकदा काहीतरी विशेष प्लॅन करावा लागेल. तुमच्या छंदानुसार तुम्ही साहसी ट्रीप किंवा नवीन रेस्टॉरंट वा नवे शहर फिरण्यासाठी निवडावे. नातेसंबंध मजबूत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जे तुमच्यातील प्रेम टिकवून ठेवण्यास मदत करते आणि तुमच्या नात्यात अधिक जवळीकता आणते
वर्षातून एक मोठी सुट्टी
जोडीदारासह घालवा सुट्टी
काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये माणसाला सुट्ट्यांचीही गरज असते. त्यामुळे या मॅरेज रूल्सनुसार वर्षातून एकदा एक आठवड्याची रजा घेण्याचेही नियोजनही जोड्यांनी करावे. यानुसार वीकेंड गेटवेवर एकदा तरी जावे. यामुळे जोडप्याला आराम करण्याची आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते आणि नात्यात कमी दुरावा येतो