
रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील 'हे' अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद
हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मरण्याची परवानगी… नेहमीच असतो रात्रीचा अंधार
कायदा सर्वांसाठी समान आहे (कलम १४)
कलमाच्या नावावरून आपल्याला याचे महत्त्व स्पष्ट समजते. हा कलम सर्वांना आठवून करून देतो की, भारतात कायदा कुणासाठीही वेगळा नाही. इथे ना कोणी लहान आहे ना मोठं, ना श्रीमंत ना गरीब… गुन्हा कोणीही केला तरी कायद्याने त्याला सारखीच शिक्षा दिली जाईल. हा कायदा समानतेचे प्रतीक करतो आणि कुणाशीही भेदभाव न करण्याचे महत्त्व सांगतो.
भेदभाव सहन केला जाणार नाही (कलम १५)
संविधानाच्या या कलमानुसार, तुम्ही कोणत्याही भेदभावाशिवाय देशात जगू शकता. कोणत्याही नागरिकाला त्याच्या धर्म, जात, रंग, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर हिणवले जाणार नाही किंवा वाईट वागणूक दिली जाणार आहे. इथे सर्व लोक मुक्तपणे राहू शकतात.
सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना संधी (अनुच्छेद १६)
भारतात सरकारी नोकरी फार महत्त्वाची मानली जाते. संविधानात यासाठी लिहून ठेवण्यात आले आहे की नोकरीचा अधिकार हा सर्वांना सामान आहे. धर्म, जात, रंग, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणीही सरकारी नोकरीसाठी पात्र किंवा अपात्र ठरवले जाणार नाही. म्हणजेच नोकरीसाठी सर्वांना सामान अधिकार दिला जाईल.
स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद १९)
मुक्तपणे जगायला कुणाला आवडणार नाही. आज आपण आपल्या देशात हवं तसं राहत आहोत कारण यासाठीही संविधानात तरतुदी करण्यात आल्या आहेत. संविधान आपल्याला मुक्तपणे जगण्याचा अधिकार देतो.
रोजच्या आयुष्यात कोणत्या अधिकारांचा आपण वापर करतो?
आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला या अधिकाराची मोठी मदत होते. संविधानात लिहिलेल्या या अधिकाराचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनाचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. या अधिकारात सध्या गोपनीयतेचा अधिकार आणि स्वच्छ हवा आणि पाणी मिळण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
शिक्षणाचा अधिकार (कलम २१अ)
चांगले शिक्षण व्यक्तीला घडवते. अशात संविधान आपल्याला याचाही मुक्त अधिकार देतो. कलम २१अ अंतर्गत, ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. यानुसार, कोणतीही शाळा हा अधिकार नाकारू शकत नाही.
शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती! आयुर्वेदातील अमृत, आजार राहतील चार हात लांब
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद २५)
भारत हा एक विविधतापूर्ण आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणूनच हे कलम नागरिकांच्या धर्माच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे काम करतो. यानुसार, प्रत्येकाला आपल्या धर्माला मुक्तपणे स्वीकारण्याचा, धर्माचे पालन करण्याचा, आचरण आणि प्रचार करण्याचा हक्क आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार (अनुच्छेद ३२)
संविधानातील आवश्यक अधिकारांपैकी एक म्हणजे हा अधिकार. याला “संविधानाचा आत्मा” असेही म्हटले जाते. याची मदत घेऊन जर कोणी वरीलपैकी कोणताही अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. कायदा तुम्हाला तुमच्या हक्कांची अंबलबजावणी करण्यास मदत करेल याची हमी या अधिकारात दिली जाते.