सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर सनस्क्रीन लावण्याचा सल्ला डॉक्टर देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेष करून सनस्क्रीन लावणे आवश्यक असते. सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्याच्या अतिहानीकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होत नाही. पण अनेक महिला फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच सनस्क्रीन चेहऱ्याला लावतात. पण असे केल्यामुळे चेहरा पूर्णपणे खराब आणि निस्तेज होऊन जातो. स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन लावणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यातील वातावरणात आद्र्रता असल्यामुळे चेहरा चिकट आणि तेलकट होऊन जातो. तसेच या दिवसांमध्ये अधूनमधून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर मुरूम किंवा मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स येऊ नये म्हणून स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचा वापर आवश्यक करावा.
उन्हाच्या तीव्र झळांपासून त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियमित चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे. पण अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की सनस्क्रीन लावल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स आणि फोड का येतात? तर यामागे अनेक कारण आहेत. चुकीच्या पद्धतीने सनस्क्रीन लावल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास सुरुवात होते. तसेच त्वचेला सूट न होणारे सनस्क्रीन वापरल्यामुळे चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: किती तास व्यायाम करणं शरीरासाठी योग्य?
त्वचेला सूट न होणारे सनस्क्रीन लावल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि फोड येण्यास सुरुवात होते. हे पिंपल्स मोठे झाल्यानंतर लाल होऊन फुटून जातात, मात्र त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहिल्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. तसेच सनस्क्रीन लावण्याआधी चेहरा फेसवॉशने स्वच्छ केला नाहीतर चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावू नये.
सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
हे देखील वाचा: डार्क सर्कलमुळे चेहऱ्यावरील चमक हरवली आहे? मग या सोप्या टिप्स नक्की वापरून पहा