रितेश आणि जेनेलिया देशमुखचे पालकत्व का ठरते खास (फोटो सौजन्य - Instagram)
बऱ्याचदा, सेलिब्रिटी पालक त्यांच्या मुलांना पापाराझींसमोर अर्थात व्हिडिओग्राफरसमोर आणण्याचे टाळतात. त्यांना त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला नको असतात. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, अनुष्का शर्मा-विराट कोहली यांसारख्या सेलिब्रिटी पालकांनी आतापर्यंत त्यांच्या मुलांचे चेहरे जगासमोर उघड केलेले नाहीत.
आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनीही अनेक वेळा पापाराझींना रियाचे फोटो काढण्यास नकार दिला आहे मात्र याउलट, रितेश देशमुख-जेनेलिया यांना त्यांच्या मुलांचे फोटो काढण्यात काहीच अडचण नाही, उलट त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी कोणते पालकत्व चांगले ठरते अथवा सेलिब्रिटींनी खरंच मुलांचा चेहरा लपवणं योग्य आहे का याबाबत पॅरेटिंग तज्ज्ञांकडून आपण समजून घेऊया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
जगाशी कसे वागायचे
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख कधीही त्यांची दोन्ही मुलं रायन (१०) आणि राहिल (८) यांचे चेहरे पापाराझींपासून लपवत नाही. अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की. त्याने त्याच्या मुलांना नेहमी पापाराझींसमोर हात जोडून त्यांचे फोटो काढण्यास सांगितले आणि नेहमी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून हसायला शिकवले.
तुमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की समोरच्या व्यक्ती तुमचे फोटो काढत आहेत. त्यांना मान देत क्लिक करा आणि निघून जा. हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि यामुळे मुलांना व्हिडिओग्राफर आणि जगाशी कसे वागायचे हे आपोआप शिकता येते.
मुलांना संस्कारी आणि यशस्वी बनविण्यासाठी Nita Ambani च्या 5 पॅरेंटिंग टिप्स ठरतील 100 टक्के योग्य
पालकत्व तज्ज्ञ डॉ. गीतांजली शर्मा यांनी सांगितले रितेश देशमुख आपल्या मुलांना पापाराझीसमोर आणून ही संस्कृती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. जरी मुलांना कुठेतरी विशेष वागणूक मिळत आहे हे सत्य आहे तरीही जर रितेश आणि जेनिलिया आपल्या मुलांना जमिनीवर रहायला शिकवत असून ते सकारात्मक पालकत्व निभावत आहेत.
तथापि, त्याची मुले 8 आणि 10 वर्षांची आहेत आणि किशोरावस्थेत प्रवेश करत आहेत. या वयात, मुलांचा मेंदू विकसित होतो. रितेश आणि जेनिलिया यांनी कधीही मुलांना लपवले नाही तर त्यांना या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे आणि आपणही सामान्यच आहोत ही शिकवण देत संस्कार दिले आहेत. भविष्यात नक्की काय होऊ शकते यासाठी हे पालक आपल्या मुलांना तयार करत आहेत कारण या मुलांचे जीवन असेच राहणार आहे याची पालक म्हणून त्या दोघांनाही कल्पना आहे. याचाच अर्थ आपल्या पालकांचे नक्की काम आहे याची जाणीवही त्या मुलांना व्यवस्थित आली आहे.
Parenting Tips: तुमची मुलं होतील अधिक युनिक, पालकांनी फॉलो करा या टिप्स
डॉ. गीतांजली शर्मा यांच्या मते, आलिया-दीपिका अथवा विराट-अनुष्कासारख्या सेलिब्रिटींची मुले खूपच लहान आहेत आणि त्यांचा मेंदू विकसित झालेला नाही, त्यांना गोष्टींबद्दल फारसे काही समजत नाही आणि त्यांना काहीही समजावून सांगता येत नाही. पण अनेकदा सेलिब्रिटींची मुले आकर्षणाचे केंद्र असतात.
जर मूल घराबाहेर असेल आणि पापाराझी त्यांच्याकडे येत असतील, तर मूल स्वतःला खास समजू लागते. अहंकार त्याच्या आतही येऊ शकतो. त्याला वाटते की तो खूप खास आहे, म्हणूनच ते त्याच्याकडे येत आहेत. असे मूल जास्त संवेदनशील किंवा मर्यादेपलीकडे बिघडलेले असू शकते. कारण त्याने त्याच्या आयुष्यात कोणताही संघर्ष पाहिलेला नाही. पापाराझी मुलाचे फोटो क्लिक करत असले तरी, त्यात मुलाचे कोणतेही यश नाही हे त्यांच्या पालकांचे यश आहे. त्यांचे पालक सेलिब्रिटी असल्याने ते क्लिक केले जात आहे. याचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो असे अनेकांना वाटते.
लहान मुलांमध्ये भावनिक व्यवस्थापन विकसित होत नाही कारण त्यांचा मेंदू तितका विकसित नसतो, त्यामुळे बरेच सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना पापाराझींसमोर आणत नाहीत. हेदेखील एका दृष्टीने योग्यच आहे. मात्र जे सेलिब्रिटी समोर आणतात, ते चुकीचे आहेत असं होत नाही अथवा जे समोर आणत नाहीत ते पूर्णतः चुकीचे आहेत असंही होत नाही. आपल्या मुलांना Paparazi समोर आणायचे की नाही या प्रत्येक सेलिब्रिटीचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र त्यातही रितेश आणि जेनेलिया यांची मुलं महाराष्ट्राच्या लोकांच्या दृष्टीतून नेहमीच वेगळी ठरतात हे मात्र नक्की!