‘हे’ आहे जगातील सर्वात महाग गुलाबाचं फूल, किंमत आहे 130 कोटी!

गुलाबाच्या अनेक जातींचे मिश्रण करून तयार केलेल्या ज्युलिएट रोजची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची मनमोहक रचना आणि आकर्षक पद्धतीने उगवणाऱ्यआ पाकळ्या. गुलाबाच्या फुलांची ही विविधता जगभर प्रसिद्ध आहे.

  व्हॅलेंटाईन वीकची (Valantine Week) सुरुवात रोझ डेने (Rose Day 2024) होते. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला गुलाबाचं फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. जोडपी वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या रोजच्या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. असं असलं तरी, या दिवशी नेहमीपेक्षा खूपच महाग दराने गुलाब विकले जातात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग गुलाबाचे फूल (World Expansive Rose) कोणत्या नावाने ओळखले जातं आणि त्याची किंमत किती आहे?

  ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग गुलाबाचं फूल

  रिपोर्ट नुसार, या गुलाबाच्या फुलाला ज्युलिएट रोज नावाने ओळखले जाते. पहिला ज्युलिएट गुलाब 15 वर्षांच्या मेहनतीनंतर उगवला. यापूर्वी, ज्युलिएट रोजची किंमत सुमारे 130 कोटी रुपये ($15.8 दशलक्ष) होती. जरी काही वेबसाइट्स त्याची किंमत 5 दशलक्ष डॉलर्स असल्याचा दावा करतात.

  का आहे इतकं महाग

  या गुलाबाच्या फुलाचीही एक कथा आहे. फ्लॉवर उत्पादक म्हणजेच फ्लोरिस्ट डेव्हिड ऑस्टिन यांनी प्रथम त्याने ते लावलं. त्याचं वैशिष्य म्हणजे त्याला फुलं येण्यासाठी तब्बल 15 वर्षं वाट पाहावी लागली. दरम्यान, त्यांनी रोपाची पूर्ण काळजी घेतली. हे मूळ गुलाब किंवा नैसर्गिकरित्या निसर्गात उद्भवणारे गुलाब नाही, तर अनेक दुर्मिळ फुलांचे प्रजनन करून ते तयार केले गेले आहे. 2006 मध्ये पहिल्यांदा त्याची विक्री झाली. त्यामुळे हे गुलाब इतकं महाग असल्याचं सांगण्यात येतं.

  ‘ही’ आहे ज्युलिएट रोजची सर्वात खास गोष्ट

  गुलाबाच्या अनेक जातींचे मिश्रण करून तयार केलेल्या ज्युलिएट रोजची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची मनमोहक रचना आणि आकर्षक पद्धतीने उगवणाऱ्यआ पाकळ्या. गुलाबाच्या फुलांची ही विविधता जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा अनोखा आणि अप्रतिम सुगंधही अद्वितीय आहे. हे फूल उगवणारे डेव्हिड ऑस्टिन सांगतात की, ज्युलिएट रोजचा सुगंध अतिशय हलका आणि मोहक आहे, जो परफ्यूमसारखा वाटतो. यात सुमारे 40 पाकळ्या आहेत.
  ज्युलिएट रोजच्या या मोहक सुगंधामुळे बहुतेक लोक या गुलाबाकडे आकर्षित होतात. आता ह गुलाब गुलाबी, हलका पिवळा आणि लालसर लाल रंगातही उपलब्ध आहे. हा गुलाब मुखत्वे अमेरिका आणि रशियामध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचा आकार इतर गुलाबाच्या फुलांपेक्षा मोठा आहे. 2006 मध्ये ब्रिटनमधील चेल्सी फ्लॉवर शोमध्ये हा गुलाब पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. हे जगातील सर्वात दुर्मिळ गुलाब मानले जाते.

  ज्युलिएट रोझ का म्हणातात?

  शेक्सपियरच्या कादंबरीची नायिका ज्युलिएटच्या नावावरून हे नाव देण्यात आले. असं असलं तरी, रोमिओ आणि ज्युलिएटची प्रेमकथा जगातील सर्वात रोमँटिक मानली जाते. अमेरिकेतील ऑस्टिनच्या मनात एक योजना होती की त्याने अनेक उत्तम गुलाबांचे मिश्रण असलेले गुलाब तयार करावेत तेव्हा त्याची कथा सुरू झाली. आता असे मानले जाते की ज्युलिएट गुलाबाची किंमत देखील वर्षानुवर्षे वाढत आहे. डेव्हिड ऑस्टिन आता नाही पण त्याची रोपवाटिका त्याच्या विस्तीर्ण जमिनीवर गुलाबांच्या हजारो प्रजाती उगवते आणि जगभरात त्यांची ऑनलाइन विक्री करते.