Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निरोगी आरोग्याची 6 सूत्रं, दीर्घायुष्यासाठी Jaggi Vasudev यांनी सांगितले सिक्रेट

Long Life Secret: निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य कोणाला नको असेल का? तुमचीही इच्छा असेल तर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिलेल्या 6 सूत्रांचे पालन करून पहा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 24, 2024 | 10:33 AM
सद्गुरूंनी सांगितलेले ६ सूत्रं पाळून व्हा दीर्षायुषी

सद्गुरूंनी सांगितलेले ६ सूत्रं पाळून व्हा दीर्षायुषी

Follow Us
Close
Follow Us:

आधुनिक आयुष्य हे रोग आणि समस्यांनी भरलेले आहे. शारीरिक आजारासह मानसिक आजारही कमी नाहीत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रस्त असतो. सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते याला आपण स्वतःच जास्त जबाबदार आहोत. जर आपण आपल्या जीवनाकडे सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारला तर आपण सहजपणे निरोगी जीवन जगू शकतो आणि आनंदीदेखील राहू शकतो. 

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले आहे की, जर आपण जीवनात फक्त 6 सूत्रांचा अवलंब केला तर आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आनंदी राहू शकतो. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही 6 सूत्रे. (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

नैसर्गिक अन्न 

नैसर्गिक पदार्थांचा जेवणात समावेश करा

TOI ने दिलेल्या अहवालात सद्गुरुंनी म्हटले आहे की तुम्ही जितक्या जास्त नैसर्गिक गोष्टी खाणार तितके तुम्ही निरोगी व्हाल. या नैसर्गिक गोष्टी जितक्या जास्त रिफाईंड कराल किंवा प्रोसेस्ड केल्या जातील, तितक्या जास्त आरोग्यासाठी त्रासदायक ठरतील त्यामुळे नेहमी हलके शिजवलेले संपूर्ण धान्य, ताजी फळे, बिया, हिरव्या पालेभाज्या खाणे योग्य ठरते. प्रक्रिया केलेले, रिफाईंड फूड, फास्ट फूड, जंक फूड इत्यादींचे सेवन करू नका. यामुळे आजार अधिक होतात. नैसर्गिक गोष्टी शरीराला डिटॉक्स करतील आणि रोग टाळतील.

शारीरिक हालचाली 

नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे

सद्गुरूंच्या मते, निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितले की योगासने किंवा इतर प्रकारचे व्यायाम नियमित केल्याने तुम्ही आजारी पडणार नाही. यामुळे शरीर, मन आणि आत्मा संतुलित राहतील आणि जीवनात आनंद मिळेल. हृदयाचे आरोग्य आणि वजनावर नियंत्रण राहील. सद्गुरू सांगतात की योगामध्ये सूर्यनमस्कार नियमित करा, यामुळे मन आणि अंतःकरण प्रसन्न राहतील.

हेदेखील वाचा – जेवल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सद्गुरू आणि डॉक्टरांचा सल्ला

पुरेशी झोप 

पुरेशी झोप मिळाल्याने अधिक आयुष्य मिळते

सद्गुरू सांगतात की दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. यासाठी सद्गुरूंनी लवकर झोपण्याचा आणि लवकर उठण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जास्त वेळ झोपण्यापेक्षा दर्जेदार झोप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले आणि हे व्यक्तीपरत्वे बदलते. जर तुम्हाला दर्जेदार झोप म्हणजेच खूप गाढ झोप मिळाली तर त्याचे फायदे खूप जास्त असतील.

ध्यानधारणा

रोज ध्यान करावे

दीर्घायुष्यासाठी नियमित ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू समजावून सांगतात की ध्यानाद्वारे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन स्थितींपासून आराम मिळू शकतो. यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्याच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास तरी स्वतःसाठी काढावा आणि ध्यानधारणा करावी 

हेदेखील वाचा – बदाम खाण्यापूर्वी करा एक काम, कॅन्सरचा धोका होईल कमी, सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला

सकारात्मकता 

नेहमी आनंदी राहावे

सद्गुरूंच्या मते निरोगी जीवनासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या संधीत आनंद शोधला पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल सकारात्मक भावना ठेवा. सकारात्मक विचार आणि भावनिक जोड हे आनंदी जीवनाचे रहस्य आहे. यामुळे तुम्ही दीर्घायुषी राहू शकता 

निसर्गाशी संवाद 

निसर्गाशी संवाद साधल्याने अधिक फ्रेश वाटते

सद्गुरुंच्या मते, निसर्गाशी नाते जोडणे हे देखील दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे सूत्र आहे. जर तुम्ही निसर्गाजवळ जास्त वेळ घालवला तर ते तुम्हाला आंतरिक आनंद मिळवता येईल आणि यामुळे मनाला शांती मिळेल आणि तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेने जगू शकता. 

Web Title: Sadhguru jaggi vasudev shared secret about how to live long and healthy life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 10:33 AM

Topics:  

  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर
1

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

सद्गुरू Jaggi Vasudev यांनी सांगितले सर्वात शक्तीशाली 3 पदार्थ, बद्धकोष्ठतेचे मिटवेल नामोनिषाण, डायबिटीसवरही गुणकारी
2

सद्गुरू Jaggi Vasudev यांनी सांगितले सर्वात शक्तीशाली 3 पदार्थ, बद्धकोष्ठतेचे मिटवेल नामोनिषाण, डायबिटीसवरही गुणकारी

दीर्घकाळ जगण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेवांचा मोलाचा सल्ला, ‘हा’ सफेद ज्युस हमखास देईल सकारात्मक परिणाम
3

दीर्घकाळ जगण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेवांचा मोलाचा सल्ला, ‘हा’ सफेद ज्युस हमखास देईल सकारात्मक परिणाम

Health Tips: सद्गुरु जग्गी वासुदेवांनी दिला 3 पदार्थ सोडण्याचा सल्ला, शरीर राहील अधिक Active
4

Health Tips: सद्गुरु जग्गी वासुदेवांनी दिला 3 पदार्थ सोडण्याचा सल्ला, शरीर राहील अधिक Active

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.