बदाम कसे खावे सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा सल्ला
बदाम खाल्ल्यानेदेखील कर्करोग होऊ शकतो. वाचून धक्का बसला ना? आता बरेच लोक म्हणतील हा काय विनोद आहे. होय, जर तुम्ही हा लेख पूर्ण वाचला नाही तर बदाम खाल्ल्याने कर्करोग कसा होतो हे तुम्हाला कधीच कळणार नाही.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी बदाम खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगितले आहे. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, बदामाला ब्रेन बूस्टरदेखील म्हणतात. रोज बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती अनेक पटींनी वाढते. बदाम खाणे कोणत्याही पद्धतीने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण अनेकदा बदाम खाण्यात मोठी चूक करतात. पण ही नक्की चूक कोणती? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर कॅन्सरचा धोका असू शकतो. बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
अशी चूक करणे टाळा
बदाम खाताना कोणती चूक करू नये
फिरताना किंवा ऑफिसमध्ये बदाम मूठभर खाणारे बरेच लोक आहेत. अनेक जण घरी सकाळी उठल्यानंतरही बदाम खातात. मात्र हे अनेक पद्धतीने हानिकारक असू शकते. बदाम भिजवून खावे असेही मानले जाते. अशा परिस्थितीत बरेच लोक रात्रीच्या वेळी बदाम एका भांड्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी ते खातात, परंतु जे लोक भिजवलेले बदाम खातात ते अनेकदा मोठी चूक करतात.
हेदेखील वाचा – काजू, बदाम, पिस्ता नाही तर या ड्रायफ्रुटच्या सेवनाने वजन कमी होईल, वाचा सविस्तर
कसे खावेत बदाम
बदाम खाण्याची पद्धत काय आहे
बदाम खाणे आणि भिजवून खाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, ज्या बहुतेक लोकांना माहीत आहेत. परंतु, बदाम भिजवून नंतर सोलून खावेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक बदाम भिजवून नंतर सोलून खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. अनेकजण बदाम भिजवून खातात पण त्याची सालं सोलून खात नाहीत आणि हीच सर्वात मोठी चूक आहे
बदाम का सोलून खावेत?
बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती
बदाम सोलून खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदामाच्या सालीखाली काही घटक असतात, ज्यामुळे कर्करोग होतो. बदामामध्ये काही रसायने असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. म्हणून जेव्हा ते पाण्यात भिजवले जाते तेव्हा ही कॅन्सर निर्माण करणारी रसायने बदामाच्या सालीच्या अगदी खाली असतात, त्यामुळे कीटक ते खात नाहीत. अशा स्थितीत बदाम भिजवून त्याची साल काढली की रसायने आणि कीटक दोन्ही बाहेर राहतात आणि मग तुमच्यासमोर पूर्णपणे शुद्ध बदाम असतात, जे खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो.
हेदेखील वाचा – रोज जेवल्यानंतर खा 1 पान, नसा होतील हलक्या विष पडेल बाहेर, सद्गुरूंचा अनमोल सल्ला
काय सांगतात सद्गुरू