Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Census 2026: सावध राहा नाहीतर तुमच्याबरोबर देखील होऊ शकते फसवणूक ? खरे जणगणना करणारे अधिकारी ओळखावेत कसे ?

तुमच्याही घरी जनगणनेसाठी माणसं यायला सुरुवात झाली आहे का? मग सावध तुम्ही सावध राहायला पाहिजे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 12:34 PM
पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुण्यात जनगणनेसाठी तब्बल 12000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:

सावध राहा नाहीतर तुमच्याबरोबर देखील होऊ शकते फसवणूक ?
खरे जणगणना करणारे अधिकारी ओळखावेत कसे ?

जनगणनेसाठी अनेकदा शासनाची माणसं तुमच्या दाारात देऊन माहिती घेऊन जातात. पण अनेकदा या सगळ्याचा गैरफायदा घेत काही माणसं तुमची दिशाभूल देखील करतात. तुमच्याही घरी जनगणनेसाठी माणसं यायला सुरुवात झाली आहे का? मग सावध तुम्ही सावध राहायला पाहिजे. असं नाही की शासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायची नाही पण हे अधिकारी खरे आहेत की खोटे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

पालकांनी मुलांशी कसं वागावं ? कोणत्या आहेत 6 गोष्टी ज्याचा विचार करायलाच पाहिजे ?

कारण सध्या एक scam मोठ्या प्रमाणत होतोय. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात. 1 एप्रिलपासून तुमच्या घरी जनगणना अधिकारी यायला सुरुवात झाली असेल. हे अधिकारी तुम्हाला तुमच्या कुटुंबाबाबत अगदी साधे आणि सोपे प्रश्न विचारतील. पण हे प्रश्न नेमके कोणते आहेत आणि फसवणूक करणारे अधिकारी कोणते प्रश्न विचारणार आहेत हे आपण जाणून घेऊया.

आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या घरात किती माणसं राहतात? पिण्याचं पाणी तुम्हाला कुठून मिळतंय? तुमच्या घरात TV, laptop, fridge अशा कोणत्या सुविधा आहेत? तुम्ही राहत असणारे घर तुमचे स्वतःचे आहे की भाड्याचे आहे? हे साधे आणि सोपे प्रश्न जर जनगणना अधिकारी तुम्हाला विचारत असतील तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बिनधास्त द्या.

पण यानंतर फसवणूक करणारे अधिकारी तुम्हाला कोणते प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी सांगणं ठरू शकतं घातक? बँकेचं खाते क्रमांक, तुमचे ration card व आधार card, PAN card क्रमांक विचारल्यास नक्कीच धोका आहे. कोणत्याही प्रकारचं OTP देणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लक्षात ठेवा की खरे जनगणना अधिकारी जे असतात ते यापैकी तुम्हाला काहीही विचारत नाहीत. पण तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि OTP दिला तर तुमच्या खात्यातली सगळी रक्कम एका क्षणात गायब होऊ शकते.

हा कोणत्याही प्रकारचा एक scam असू शकतो. त्यामुळे वेळेत सावध रहा. याशिवाय फसवणूक करणारे अधिकारी अजूनही एक प्रकार शोधून काढतात. तो नेमका काय आहे तेही जाणून घेऊया. तुम्हाला एखादं app उघडायला सांगतील आणि त्यातील link वर click करायला प्रवृत्त करतील. याशिवाय तुमचा data verify करायचा आहे असंही तुम्हाला सांगतील. पण तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अजिबात फसू नका. कारण या link वर click केल्यास तुमची आयुष्यभराची कमाई ही एका क्षणात गायब होईल. सुरक्षितता आणि जागरूकताच तुम्हाला या scam पासून दूर ठेवू शकते.

आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?

Web Title: Scam how to identify the real census officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.