बरेचदा आपलं मूल अगदी परिपूर्ण हुशार असायला हवं असं अनेक पालकांना वाटत असतं. पण याच नादामध्ये अनेक पालकांकडून चुका होत असतात. आता या नेमक्या चुका कोणत्या आहेत तर त्या तुम्ही जाणून घ्यायलाच हव्यात.
मुलांवरचा दबाव
आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचा अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिला number असावा. मात्र University College of London च्या एका अभ्यासानुसार जे पालक आपल्या मुलांवर शैक्षणिक आणि कामगिरीचा अतिरिक्त दबाव टाकतात त्यामुळे मुलांना भविष्यात मानसिक ताण आणि नैराश्य येण्याची शक्यता असते. पालक म्हणून तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीयेत त्याचा दबाव तुम्ही तुमच्या मुलांवर टाकू शकत नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी चूक ठरते. तर ही चूक करणं टाळा.
मोबाईलचा अतिवापर
वेळेअभावी अथवा कामाच्या अभावी अनेक पालक अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या हातामध्ये mobile देतात अथवा TV चा remote चालू करून देतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाच वर्षाखालील मुलांचा screen time अगदी मर्यादित ठेवावा.
तुलना करणं
आता तिसरी आणि महत्त्वाची चूक कोणती? तर बरेचदा नकळतपणे पालक काय करतात की तो बघ कसा करतोय किंवा ती बघ कशी पुढे चालली आहे अशी तुलना करतात. तर आपल्या मुलाची कधीही अशी तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करू नये.
निर्णयामध्ये हस्तक्षेप
चौथी चूक म्हणजे पालक बरेचदा काय करतात की मुलांना निर्णयच घेऊ देत नाहीत किंवा ते जर निर्णय घेत असतील तर त्यांच्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात. यालाच helicopter parenting असंही म्हटलं जातं. पण ही चूक तुम्हाला मोठेपणी महागात पडू शकते. कारण मुलं मोठी झाल्यानंतर निर्णय घेण्यास असमर्थ ठरू शकतात. त्यामुळे सहसा त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. कारण ते कितीही चुकले, काहीही झालं तरी शेवटी त्यांना सावरणारे तुम्ही असताच. अनेकदा काय होतं की पालकांना मूल रडल्यानंतर किंवा अगदी त्याने हट्ट केल्यानंतर त्रास होतो. त्यामुळे ते त्याला शांत करण्यासाठी मारतात किंवा रडू नको असं सांगतात. पण असं अजिबात करू नका. तुम्हाला कितीही त्रास झाला तरी मुलांना असं करण्यापासून रोखू नका. कारण असं जर त्यांनी नाही केलं तर ते एकाकी पडू शकतात. त्यामुळे मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या.
पालक मुलांना वेळ देत नसणं
सर्वात महत्त्वाची आणि शेवटची चूक म्हणजे आजकाल मुलांना खेळण्यासाठी पालक वेळच देत नाहीयेत. तुम्ही तुमच्या कामातून किंवा तुमच्या घाईगडबडीच्या रोजच्या व्यवहारातून त्यांच्यासाठी किमान तीस मिनिटं वेळ काढा. त्यांच्याबरोबर बसा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्याबरोबर अभ्यास करा आणि शिवाय खेळासुद्धा. यामुळे तुमचं मूल अधिक विकसित होईल. पालक म्हणून ही छोटीशी गुंतवणूक तुमच्या मुलाचा विकास परिपूर्ण घडवू शकते. तुम्हाला तुम्ही चूक करताय की नाही हे या video मधून नक्की समजेल.






