Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील Hepatitis संसर्ग आणि गर्भधारणा; कोणता आहे धोका, तज्ज्ञांचे मत

गर्भवती असल्यास तुम्ही हेपटायटिसची काळजी घेणं किती आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया. गर्भवती महिलांना याचा संसर्ग कशा पद्धतीने होऊ शकतो याबाबत अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 31, 2025 | 11:31 AM
गर्भधारणा झाली असताना काय होतो हेपेटायटिसचा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

गर्भधारणा झाली असताना काय होतो हेपेटायटिसचा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही गर्भवती असाल तर पावसाळ्यात जास्त काळजी घ्या कारण हिपॅटायटीस ए आणि ई सारखे संसर्ग आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक असू शकतात. या लेखाच्या माध्यमातून गर्भवती महिलांनी पाळल्या पाहिजेत अशा महत्त्वाच्या टिप्सवर सांगण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासारख्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. गर्भवती महिलांना याचा सर्वाधीक धोका असतो. गर्भवती मातांनी या ऋतूत प्रतिबंधात्मक पाऊल उचलले पाहिजेत, कारण हेपेटायटीस, विशेषतः हेपेटायटीस ई, गर्भधारणेत गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते. 

हेपेटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे यकृताला सूज येते आणि तो प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो, जे पावसाळ्यात अधिक सामान्य असतात. हेपेटायटीस ए आणि ई सारखे संसर्ग गर्भवती महिलांसाठी चिंताजनक ठरतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असते, ज्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेने संसर्गाचा धोका अधिक असतो. डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

गर्भधारणेत का वाढतो धोका?

गर्भवती महिलांना, विशेषतः तिसऱ्या तिमाहीत, हिपॅटायटीस ईचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यकृत निकामी होणे, अकाली प्रसूती किंवा गर्भावह दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. हिपॅटायटीस ए मुळे डिहायड्रेशन, दीर्घकाळ आजार आणि उपचार न केल्यास गुंतागुंत होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान, कोणत्याही विषाणू संसर्गाचा शरीरावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. हिपॅटायटीस संसर्गामुळे तीव्र थकवा, मळमळ आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक

गर्भवती महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

  • अत्यंत थकवा येणे
  • मळमळ आणि उलट्या
  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणे (कावीळ)
  • लघवीचा रंग गडद होणे
  • फिकट रंगाचे मल
  • ताप येणे आणि भूक न लागणे

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर गर्भवती महिलांनी त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

एड्सपेक्षाही धोकादायक ठरतोय हेपेटायटिस आजार, कसे ओळखाल संकेत

प्रतिबंधात्मक उपाय

  • गाळून व उकळून थंड केलेले पाणी प्या आणि बाहेरील, म्हणजेच रेस्टॉरंटमधील पाण्याचे सेवन टाळा
  • बाहेरील अन्न, विशेषतः कच्चे आणि कमी शिजवलेल्या पदार्थांचे सेवन टाळा, उघड्यावरील सॅलड खाणे टाळा, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात चांगले स्वच्छ धुवा
  • जर तुम्ही हेपेटायटीस ए चे लसीकरण केले नसेल तर करुन घ्या, ताजे, योग्यरित्या शिजवलेले, स्वच्छ आणि गरम अन्नाचे सेवन करा 
  • शिवाय, पावसाळ्यात नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करुन घ्या. योग्य हायड्रेशन राखा. स्वच्छतेच्या आणि आहाराच्या चांगल्या सवयींमुळे संसर्ग टाळता येऊ शकतो. गर्भवती महिलांनी याबाबत अतिशय सतर्क राहणे गरजेचे आहे.

गरोदरपणात वरील सर्वच बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, आणि त्याहूनही अधिक इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. गर्भवती माता या महत्त्वाच्या टप्प्यात हेपेटायटीस संसर्ग टाळू शकतात आणि निरोगी जीवनशैली जगू शकतात.

Web Title: Seasonal hepatitis infection and pregnancy know details expert opinion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • during pregnancy
  • hepatitis
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण
1

Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण

World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक
2

World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक

Pregnancy In Space: अंतराळात जन्म घेऊ शकते का बाळ? मानवजातीची सर्वात मोठी उत्सुकता; काय आहे उत्तर
3

Pregnancy In Space: अंतराळात जन्म घेऊ शकते का बाळ? मानवजातीची सर्वात मोठी उत्सुकता; काय आहे उत्तर

प्रेगन्सीदरम्यान का मळमळते, काय आहे नक्की ‘केमिकल लोचा’
4

प्रेगन्सीदरम्यान का मळमळते, काय आहे नक्की ‘केमिकल लोचा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.