हेपेटायटिसची लक्षणे ओळखा
हेपेटायटिस हा एक असा आजार आहे ज्याबद्दल सामान्यतः फारसे बोलले जात नाही, परंतु जर यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर तो एड्सपेक्षाही जास्त घातक ठरू शकतो, कारण त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
वास्तविक, हेपेटायटिसही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये लिव्हरची जळजळ लक्षणीयरीत्या वाढते आणि यामध्ये विषाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 354 दशलक्ष लोकांना याचा फटका बसला आहे. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
हेदेखील वाचा – गरोदर माता आणि न जन्मलेल्या बाळांना हेपेटायटिस बी संसर्गाचा धोका अधिक
हेपेटायटिसचे संकेत
हेपेटायटिसचे धोके खूप गंभीर असू शकतात, त्यामुळे ते टाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. हा धोकादायक आजार कसा टाळायचा ते जाणून घेऊया. यासाठी काही ठराविक गोष्टी केल्यास आजार टळू शकतो.
लसीकरण करा
हेपेटायटिससाठी लसीकरण करणे महत्त्वाचे
हेपेटायटिस टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या लसी लहान वय असतानाच घेणे. असे केल्याने, हेपेटायटिसचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. असे असले तरीही अजूनपर्यंत हेपेटायटिस सी आणि ई च्या लसींचा शोध लागलेला नाही.
व्हायरसचा संपर्क टाळा
हेपेटायटिस विषाणूचा संसर्ग जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील द्रव दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातो तेव्हा पसरतो. म्हणून, ज्यांना हा आजार आहे त्यांच्याशी अंतर्गत संपर्क टाळावा. यामध्ये रेझर शेअर करणे, सुया वाटणे, दुसऱ्याचा टूथब्रश वापरणे, दुसऱ्याच्या रक्ताला स्पर्श करणे आणि असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे यांचा समावेश होतो. तुम्हीही असे करत असाल तर त्यांच्यापासून ताबडतोब दूर राहा.
दूषित पाणी आणि अन्न टाळा
पाण्यातील दूषितपणा ठरतो कारणीभूत
नेहमी घरातील स्वच्छ पाणी आणि अन्नाचे सेवन करा. अनेकदा लोक बाहेरच्या गोष्टी खाऊन हेपेटायटिसचे बळी होतात, मग निरोगी व्हायला खूप वेळ लागतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात अधिक आजार पसरतात अशावेळी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. स्वतःला जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.