Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan Wishes: नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा धागा! रक्षाबंधननिमित्त लाडक्या भावंडाना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

बहीण भावाच्या नात्यातील प्रेम आणि गोडवा वाढवण्यासाठी रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधननिमित्त भावंडाना पाठवा या मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2026 | 05:30 AM
नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा धागा! रक्षाबंधननिमित्त लाडक्या भावंडाना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा धागा! रक्षाबंधननिमित्त लाडक्या भावंडाना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

यंदाच्या वर्षी २८ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणाऱ्या सणांची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. यादिवशी बहीण भावाची ओवाळणी करून भावाच्या हातामध्ये राखी बांधते. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी रक्षाबंधन सण साजरा केला जातो. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा लाडक्या भावाला या मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सणांचा आनंद वाढवू शकता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून भावाला खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Raksha Bandhan 2026: राखीच्या धाग्यापलीकडचं नातं! झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या भावंडांसोबतच्या खास आठवणी

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कितीही भांडलो तरी तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे.
तू माझा सर्वात मोठा मित्र आणि आधार आहेस.
रक्षाबंधनाच्या खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा, दादा!

तू फक्त माझी बहीण नाहीस, तर माझी सख्खी मैत्रीण आहेस.
प्रत्येक क्षणी तुझं हसू आणि आनंद पाहण्यातच मला समाधान मिळते.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, ताई!

नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय, हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी, आज सारं सारं आठवलंय हातातल्या राखीसोबतच, ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय….

एक धागा, एक विश्वास,
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची आठवण,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्या
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

छोटेसे बहीण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहीण म्हणजे दुसरी आई
जगावेगळी माझी ताई
ती माझी सावली
आणि माझ्या आयुष्यातली खरी माऊली
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…
सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

नातं बहीण भावाचं म्हणजे टॉम अॅंड जेरी
जेवढा राग आणि तेवढं प्रेम हे म्हणजे लय भारी
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

लग्नात सर्वात जास्त रडतो तो नवरीचा भाऊ असतो..
कितीही भांडण केले तरी बहिण म्हणजे भावाच्या ह्रदयाचा तुकडा असतो..
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा धागा म्हणजे राखी;
याशिवाय आणखी काय हवं बाकी!
-रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार, तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार.
-रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते, नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते.
लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आठवणींच्या हिंदोळ्यात तिचं वेगळंच स्थान आहे,
कारण ताई माझी खूपच छान आहे.
रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

भावाची गोष्ट खटकली तर ती कधी-कधी अबोला धरेल,
पण तो संकटात असल्यावर ताई साऱ्या जगाशी भिडेल.
रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा धागा! रक्षाबंधननिमित्त लाडक्या भावंडाना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Web Title: Send heartfelt marathi wishes to your beloved siblings on the occasion of raksha bandhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • Festive Season
  • rakshabandhan

संबंधित बातम्या

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Narali Purnima: कोळी बांधवांसाठी का खास आहे नारळी पौर्णिमा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा
2

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
3

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी
4

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.