Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागाची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे नागपंचमीच्या नातेवाईकांना मराठमोळा शुभेच्छा पाठवून आनंद व्यक्त करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2026 | 05:30 AM
नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी...! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी...! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे नागपंचमी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी नागाची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. नाग या प्राण्याबद्दल समाजामध्ये आदर आणि पूज्य भावना निर्माण करण्यासाठी नागपंचमी साजरा केली जाते. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार नाग हे भगवान शंकराचे अलंकार मानले जातात आणि श्रीविष्णूचा शयनकाळही शेषावर असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला खूप जास्त महत्व आहे. याशिवाय अशी मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी तव्यावर भाजलेले [पदार्थ बनवले जात नाहीत. नागाच्या नैवेद्यामध्ये शिजवलेले किंवा उकडलेले पदार्थ असतात. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला नातेवाईकांना शेअर करा या मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – pinterest)

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

निसर्ग आणि बळीराजा सन्मान:
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची..
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पारंपारिक आणि गोड आठवण:
दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो!
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा!

महादेवाच्या भक्तांसाठी:
शिवाच्या गळ्यात सर्प दिसे अतिसुंदर,
आज नागपंचमीच्या दिनी करूया नागदेवताला वंदन!
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

समृद्धीसाठी प्रार्थना:
निसर्गात पसरले नवचैतन्य नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार…
नागपंचमीच्या शुभेच्छा

भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे…
नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे.
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला…
नागपंचमीच्या शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली…
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा… नागपंचमीच्या शुभेच्छा

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस…
नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा

पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा

दूध लाह्या वाहू नागोबाला,
चल गं सखे जाऊ वारूळाला…
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा

नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी…
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा

पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…

चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला,
नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला…
नागपंचमीच्या शुभेच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या शुभेच्छा

सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत
नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण…
नागपंचमीच्या शुभेच्छा

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…
नागपंचमीच्या शुभेच्छा

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा

नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या शुभेच्छा

Web Title: Send heartfelt marathi wishes to your loved ones on nag panchami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • nagpanchami news
  • Shravan 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.