(फोटो सौजन्य: Pinterest)
Valentine Day 2026: प्रेमाची डिजीटल खूण तरूणाईची पसंती! काय आहे ‘कपल्स गर्ल रिंग’
जिम किट
अनेक मुलं हे अधिकतर जिम फ्रिक असतात, त्यांना जिममध्ये जाणं, एक्सरसाईझ करणं, एक परफेक्ट बाॅडी बनवणं या गोष्टी फार आवडतात. अशात तुम्ही तुमच्या जोडीदाराला जिम किट भेट देऊ शकता. तुमचा जोडीदार ते पाहून आनंदित होईल. ते रोजच्या वापरावे आहे.
वॉलेट गिफ्ट द्या
तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला ब्रँडेड कपडे किंवा शूज, परफ्यूम, ग्रूमिंग किट, सेल्फ-केअर किट, बेल्ट, सनग्लासेस इत्यादी भेट देऊ शकता. आवडत्या रंगाचे व्हॉलेट गिफ्ट द्या आणि त्यात तुमच्या दोघांचा फोटो ठेवा. व्हॅलेंटाईन डेसाठी ही एक उत्तम भेटवस्तू कल्पना आहे.
स्क्रॅपबुक
स्क्रॅपबुक देखील एक उत्तम भेट असू शकते. तुम्ही तुमच्या पहिल्या व्हॉट्सअॅप चॅटचा किंवा काही खास क्षणांच्या फोटोंचा कोलाज प्रिंट करू शकता आणि एक स्क्रैपबुक तयार करू शकता. तुमचा जोडीदार ते पाहून नक्कीच आनंदी होईल.
कस्टमाइज्ड भेटवस्तू
तुमच्या जोडीदाराला यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे निमित्त जर तुम्हाला काही खास आणि अनोखं गिफ्ट भेट म्हणून द्यायचं असेल तर एक कस्टमाइज्ड भेटवस्तू तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. तुम्ही एक क्युट फोटो फ्रेम, कुशन, मग किंवा ब्रेसलेट तयार करू शकता, ज्यामध्ये एक संस्मरणीय फोटो असेल. तुम्ही कस्टमाइज्ड बँड देखील आपल्या पार्टनरला गिफ्ट करु शकता.
छोट्या ट्रिप प्लॅन करा
जर तुम्हाला आणखी खास काहीतरी करायचे असेल तर तुमच्या जोडीदाराला लॉन्ग ड्राइव्हवर घेऊन जा किंवा एखाद्या छान पार्कमध्ये काही वेळ घालावा. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही दोन दिवसांच्या छोट्या ट्रिपवर देखील जाऊ शकता.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






