रक्षाबंधननिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश
बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणाला छान छान भेटवस्तू देतो. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. सर्वच बहिणी रक्षाबंधन सणांची वाट पाहत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना आणि बहीण भावाला शुभेच्छा देण्यासाठी काही सुंदर संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून सगळण्याचा आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)
नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय, हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी, आज सारं सारं आठवलंय हातातल्या राखीसोबतच, ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय….
रक्षाबंधन म्हणजे पवित्र नात्याचे सण,
भाऊबीज मनाचे गण.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
एक धागा, एक विश्वास,
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची आठवण,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्या
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा
छोटेसे बहीण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बहीण म्हणजे दुसरी आई
जगावेगळी माझी ताई
ती माझी सावली
आणि माझ्या आयुष्यातली खरी माऊली
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…
सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
नातं बहीण भावाचं म्हणजे टॉम अॅंड जेरी
जेवढा राग आणि तेवढं प्रेम हे म्हणजे लय भारी
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
लग्नात सर्वात जास्त रडतो तो नवरीचा भाऊ असतो..
कितीही भांडण केले तरी बहिण म्हणजे भावाच्या ह्रदयाचा तुकडा असतो..
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा धागा म्हणजे राखी;
याशिवाय आणखी काय हवं बाकी!
-रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार, तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार.
-रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते, नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते.
लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आठवणींच्या हिंदोळ्यात तिचं वेगळंच स्थान आहे,
कारण ताई माझी खूपच छान आहे.
रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भावाची गोष्ट खटकली तर ती कधी-कधी अबोला धरेल,
पण तो संकटात असल्यावर ताई साऱ्या जगाशी भिडेल.
रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, भाऊ-बहिणीच्या जीवनात होईल प्रगती
राखी बांधून हातात बहिण ओवळे भावाला
भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला
निराळ्या मायेचा झरा कायम असाच वाहत राहो.
-राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.