फोटो सौजन्य- pinterest
रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणींसाठी विशेष असतो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तर भाऊ रक्षण करण्याचे वचन देतो. तसेच बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी देवांना देखील राखी बांधण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी काही उपाय केल्याने बहिणीच्या जीवनात आनंद येऊ शकतो. तसेच तिला जीवनामध्ये प्रगती, संपत्ती आणि सौभाग्य मिळू शकते. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या.
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर सर्वांत पहिले देवाची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर सर्व राख्या ओवाळणीच्या ताटात ठेवाव्यात. त्यामध्ये एक चांदीचे नाणे ठेवावे. जर शक्य नसल्यास तुम्ही एक रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाला राखी बांधून ते नाणे किंवा रुपया देव्हाऱ्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर ते नाणे किंवा रुपया लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. यामुळे जीवनात येणाऱ्या पैशांच्या समस्या दूर होऊन संपत्तीमध्ये वाढ होईल.
मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी महादेवाला अभिषेक करावा. यामुळे लाभ होतात. अभिषेक करण्यासाठी दूध, दही, मध, तूप आणि साखर याचा वापर करावा. यानंतर विधीवत पूजा करुन महादेवांना राखी बांधावी. या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती होऊ शकते. तसेच भावा बहिणीच्या जीवनातील सर्व प्रकारचे त्रास दूर होऊ शकतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी. तसेच ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. या मंत्रांसोबतच ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्रांचा देखील जप करावा. या उपायामुळे घरातील व्यक्तीची समस्यांतून सुटका होऊ शकते. कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहू शकते. या उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण किंवा कुटुंबाच्या रक्षणासाठी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. मोहरी, केशर, सोने किंवा एक रुपयाचे नाणे, चंदन, तांदूळ आणि दुर्वा या सर्व गोष्टी कापडामध्ये गुंडाळून ठेवा. त्यानंतर रंगीत धाग्याच्या मदतीने कापड गुंडाळून ते घरातील देव्हाऱ्यात ठेवा. यासाठी तुम्ही कलशाची देखील स्थापना करु शकता. हा उपाय केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)