
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या 'या' खास शुभेच्छा
Bhaubeej 2026: बहीण भावाच्या नात्यातील अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाची ओवाळणी करते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. याशिवाय भाऊ बहिणाला सुंदर सुंदर गिफ्ट देतो. पौराणिक आख्यायिकेनुसार, यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या घरी यमराजाला भोजनाचे निमंत्रण दिले होते. यमराजाने येऊन यमुना बहिणीचे आतिथ्य स्वीकारले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने या दिवशी जो भाऊ बहिणीकडे येऊन भोजन करेल त्याला यमभय असू नये, असा वर मागितला होता. त्या दिवसापासून भाऊबीज हा सण साजरा केला जाऊ लागला. भाऊबीजेच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे बहीण भावाच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी भाऊबीजेच्या या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)
बंधुत्वाच्या पवित्र नात्याची रेशमी वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज!
भाऊ-बहिणीच्या या गोड नात्याला कोणाचीही नजर न लागो
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
ओवाळिते भाऊराया, उदंड उदंड आयुष्य लाभावे तुला!
यश, कीर्ती आणि समृद्धीने तुझे जीवन नेहमी उजळून निघावे
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लहानपणीची ती भांडणे, आज आठवून हसायला येते…
जरी कितीही दूर असले, तरी दादा तुझी आठवण नेहमी येतेभाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!
नात्यात असो गोडवा नेहमी, कधी न यावी त्यात दुरावा
भाऊ-बहिणीचे हे पवित्र नाते, जन्मोजन्मी असेच टिकून राहावे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा सण!
आजच्या या मंगल दिनी भावाच्या दीर्घायुष्यासाठी
बहिणीच्या मनातून निघणारी एकच प्रार्थना
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
दिव्यांच्या लखलखाटात आणि रांगोळीच्या रंगात,
भाऊ-बहिणीचे प्रेम आणखी गहिरे व्हावे
तुझ्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत!
भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
बहिणीची माया आणि भावाची साथ, हे नाते असते खूपच खास!
या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणारा भाऊबीजेचा हा सण खूप खूप आनंदाचा जावो.
आजचा दिवस खूप विशेष, भावासाठी आहे मनात प्रेम अमाप!
तुझ्या आयुष्यात सदैव सुख आणि समृद्धी येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
दिव्याच्या वातीप्रमाणे आपले नाते सदैव तेवत राहो,
बहिणीचे प्रेम आणि भावाची माया अशीच कायम राहो
तुला भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भाऊबीजेचा हा सण तुझ्या आयुष्यात
नवी आशा, आनंद आणि यश घेऊन येवो.
माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या उदंड शुभेच्छा!
नाते भाऊ-बहिणीचे, प्रेम आणि विश्वासाचे!
प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या
माझ्या भावाला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
ओवाळणीत मला फक्त तुझे हास्य आणि तुझी साथ हवी आहे
भावा, तू कायम असाच आनंदी राहा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणीच्या आठवणी आणि आजचे हे प्रेम,
भाऊबीजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ताजे झाले
माझ्या लाडक्या दादाला भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात सण पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छाकौटुंबिक सहल प्लॅन करा
बहीण टिळक लावते मग मिठाई खाऊ घालते. भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते, भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये. माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!
लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या, नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या, रागावू नकोस या वेड्या भावावर….. नेहमी अशीच खुश रहा, नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!
भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो, तुमच्या आजूबाजूला आनंद असो, पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल, तुम्ही मला काही कमिशन द्या…!!! तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा !!
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला ✨ देतो नेहमीच हात…ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!