मैत्रीचे नाते कायम जपण्यासाठी मित्र मैत्रिणींना पाठवा 'या' गोड शुभेच्छा
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ३ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी खास मित्र असतोच. रक्तापलीकडच्या प्रेमळ नात्यात सुख-दुःखाचे क्षण कायमच एकमेकांसोबत शेअर केले जातात. लहान मोठ्या समस्यांपासून ते अगदी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा रंगतात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये मैत्रीकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मित्र मैत्रिणींना पाठ्वण्यासाठी काही हटके शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुमचे मित्रमैत्रिणी खूप जास्त खुश होतील. चला तर जाणून घेऊया हटके शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)
Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे निमित्त पाठवा तुमच्या मित्र मैत्रीणींना या कविता आणि शायरी
गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात
तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे
तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट,
तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात
Happy Friendship day
लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो….
Happy Friendship day
पेक्षांचं जहाज बुडू शकत नाही…
प्रकाशाचा दिवा कोणीही विझवू शकत नाही…
ए माझ्या जिवलग मित्रा…
तु तर ताजमहाल आहेस, जे कोणीही पुन्हा घडवू शकत नाही…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हाही आम्ही या जगाचा निरोप घेऊ,
तेव्हा खूप आनंद आणि आपुलकी देऊन जाऊ,
जेव्हा जेव्हा या वेड्या मित्राची येईल आठवण ,
हसता-हसता डोळ्यातून येतील नक्कीच अश्रू बाहेर
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्र मनातील प्रत्येक गोष्ट समजून घेतात,
सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात कायम सोबत असतात,
खरे मित्र त्यांनाच भेटतात, जे भाग्यवान असतात,
असे नशीब लाभो वारंवार, हीच देवाकडे आमची प्रार्थना!
हॅपी फ्रेंडशिप डे
मैत्रीपेक्षा अधिक मौल्यवान कोणतीही संपत्ती नाही,
मैत्रीपेक्षा चांगली कोणतीही प्रतिमा नाही,
मैत्री ही कच्च्या धाग्यासारखी आहे,
पण या धाग्यापेक्षा मजबूत कोणतीही साखळी
या जगात नाही!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या मैत्रीने खूप काही शिकवलं
माझ्या जीवनात सुख आलं,
ऋणी आहे मी देवाचा
ज्याने मला तुझ्यासारख्या मित्राला भेटवलं!!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,
पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत
आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की
आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत !!!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !
गुलाबाच्या फुलाचा सुगंध चोरला जाऊ शकत नाही,
सूर्याची किरणे रोखली जाऊ शकत नाहीत,
मित्रांमध्ये कितीही अंतर असले तरीही,
खास मित्रांना विसरले जाऊ शकत नाहीत !!
हॅपी फ्रेंडशिप डे
एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
नात्यातील माया कायम टिकून राहू दे,
आपली मैत्री अधिक घट्ट होऊ दे,
नवीन मित्रमैत्रिणी आयुष्यात भेटत राहतीलच
पण हा जुना मित्र कायम आठवणीत राहू दे
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !
मैत्रीचा शोध घेतला जात नाही,
प्रत्येकासोबत मैत्रीचे नाते जोडले जात नाही,
आणि खास मित्रांचं आयुष्यातलं स्थान
कोणी हिरावून घेऊ शकत नाही
हॅपी फ्रेंडशिप डे !
मैत्रीचं नातं लाखमोलाचं असते
प्रेमामध्ये मैत्रीचं नातं दुरावते
पण मैत्रीतील प्रेम कायम वाढतच जातं
हॅपी फ्रेंडशिप डे !
अडचणीत कायम सोबत असतात मित्र
दुःख वाटून घेतात मित्र
रक्ताचं नात नसतानाही
आयुष्यभर साथ देतात मित्र
हॅपी फ्रेंडशिप डे !!!
जीवन आहे तर आठवणी आहेत
आठवण आहे तर भावना आहेत
भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!