
तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो...! मकर संक्रांतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या गोड शुभेच्छा
मकर संक्रांत सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. देशभरात सगळीकडे मकरसंक्रांत सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. यादिवशी शेतात आलेल्या धान्याची आणि भाजीची पूजा केली जाते. यालाच सुगड पूजन असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर महिलांना हळदीकुंकू दिले जाते. हळदीकुंकू कार्यक्रमात वेगवेगळे वाण वाटले जातात. काळ्या रंगाची साडी नेसून हलव्याचे सुंदर सुंदर दागिने परिधान करण्याची पारंपरिक पद्धत अजूनही फॉलो केली जाते. मकर संक्रांतीला केवळ वाण नाहीतर मनातली कटुता विसरून गोड शब्दांनी नात्यांना जपणे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीनिमित्त लाडक्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)
‘न खाई भोगी तो सदा रोगी’ भोगीनिमित्त नातेवाईक आणि लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा
तुझ्या सोबत प्रत्येक सण खास वाटतो,
तिळगुळासारखा गोड सहवास
आयुष्यभर राहो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
तिळासारखी घट्ट नाती
आणि गुळासारखा गोड संवाद
आयुष्यभर टिकून राहो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळासारखी घट्ट मैत्री आणि
गुळासारखा गोडवा नात्यांत राहो.
शुभ मकर संक्रांती!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
आयुष्यात सुख-समाधान येवो, हीच सदिच्छा!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या सूर्यकिरणांसोबत
नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो,
राग, द्वेष, कटुता दूर जावो.
मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा!
आज संक्रांती…
जुन्या वाईट आठवणी विसरून
नव्या नात्यांची, नव्या सुरुवातीची वेळ.
Happy Makar Sankranti!
उत्तरायणाची सुरुवात म्हणजे
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास.
तुमचं आयुष्य नेहमी उजळ राहो!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
आयुष्यात सुख-समाधान येवो, हीच सदिच्छा!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला!
मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील महत्व
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!