छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या शहाजी राज्यांची वाचा प्रेरणादायी गोष्ट
१८ मार्चला शहाजीराजे भोसले यांची जयंती असते. मागील काही वर्षांपासून शहाजी राज्यांची जयंती औरंगाबादमधील वेरूळमध्ये साजरी केली जाते. शहाजीराजेंची जयंती साजरी करण्यासाठी उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाची स्थापना केली. मात्र यामागचे खरे हक्कदार शहाजी राजेंचे आहेत. शिवाजी महाराजा 16 व्या शतकात बलाढ्य निझामांना पराभूत करून हिंदवी स्वराज स्थापन केले. स्वराज स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी मोठी मदत केली होती. शिवरायांनी आपल्या वडिलांच्या आदर्शाचा धडा संपूर्ण जगाला घालून दिला.
Kalpana Chawla Birthday : कल्पनेचे पंख, अवकाशाचा स्पर्श! वाचा कल्पना चावलाची आकाशगंगा प्रवासकथा
18 मार्च 1594 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ येथे शहाजी राजांचा जन्म झाला. जो पुढे स्वराज्य संकल्पक ठरला.बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांची मुलगी जिजाबाईंसोबत शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. 1605 मध्ये विवाह झाला.
अहमदनगर जवळच्या भातवडी येथे झालेल्या युद्धात शहाजीराजे यांनी प्रथम गनिमी काव्याचा वापर केला होता.जिथे मोघल सैन्य वस्तीला होते त्या वरील भागात असलेल्या धरणाची भिंत फोडून दहा हजार सैन्यानिशी दोन लाख सैन्याच्या प्रभाव. 16 सप्टेंबर 1633 रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भिमगडावर मुर्तजा या निजमास मांडी वर घेऊन स्वतः सिंहासनाधिश्वर झाले व हे राज्य सलग तीन वर्षे चालवले म्हणजेच स्वराज्याचा संकल्प शाहागडवर घेतला.म्हणूनच शहागड हा किल्ला पुढे शहाजी महाराजांची स्वराज्य संकल्प भूमी म्हणून उदयास आली.
शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. शिवाजी महाराजांसोबत दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हे देखील पुण्यात आले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती.त्यानंतर शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर 1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व आणि घोडा खाली कोसळले आणि त्यामध्ये शहाजी राजांचा दुर्दैवी मृत्यू झाला.