फोटो सौजन्य : गुगल
“ज्याचं आरमार त्याची सत्ता, ज्याचं सागरी तटबंदीवर वर्चस्व त्याचं सैन्य बलाढ्य” शिवछत्रपतींच्या या आणि अशा कित्येक विचारांचा वारसा मोठ्या धिटाईने शंभूराजांनी पुढे चालू ठेवला. शंभूराजे शूर योद्धा तर होतेच पण कसलेले राजकारणी देखील होते. हे युरोपीयन सत्तांशी असलेले त्यांच्या परस्पर संबंध दाखवून देतात. सागरी तटबंदीवर मराठ्यांचा असलेलं वर्चस्व पाहता परकीय सत्तादेखील शंभूराजेंना वचकून असायचे. मात्र अठराव्या शतकात युरोपीय सत्ता बलाढ्य नसली तरी सागरी तटबंदीवर वर्चस्व निर्माण करण्यात बरंचसं यश प्राप्त झालं होतं. सागरी मोहिमा आणि त्यांना आलेली आव्हानं या मराठ्यांच्या एकंदरी प्रवासात युरोपीयन सत्तांचा मोठा आहे याला इतिहास साक्षीदार आहे. शिवरायांच्या काळात मराठ्यांचे युरोपीयन सत्तांशी संबंध हे वेळेनुसार बदलत जात होते. याला अपवाद शंभूराजेंचा कार्यकाळ देखील नव्हता. तत्कालीन भारतात अनेक आक्रमण झालीत, पण त्यातल्या त्यात पाच महत्त्वाच्या सत्ता आणि देश होते. यातील युरोपीय सत्ता या त्यामानाने बलाढ्य होत्या. देशातील पाच महत्त्वाच्या सत्ता म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि डेन.
यापैकी पोर्तुगीज वगळता सर्व युरोपीयन सत्तांच्या भारतात ईस्ट इंडिया कंपनी होत्या. यांपैकी डेन अर्थात डेन्मार्कच्या लोकांच्या सत्तेच्या वखारी तेव्हा तामिळनाडू आणि बंगालमध्ये होत्या. तामिळनाडूच्या तरंगमबाडी म्हणजेच ट्रांकेबार हे डेन सत्तेचे केंद्र कोडीलम नदीच्या दक्षिणेस होते. याचा मराठ्यांशी संबंध असा की, दक्षिण दिग्विजयात शिवरांयांनी जो भूभाग जिंकला होता त्याची ही दक्षिणी हद्द होती. त्यामुळे डेन सत्तेशी शंभूराजेंचा तसा फार संबंध आला नाही. पोर्तुगीजांच्या विरोधात शंभूराजेंनी थेट मोहिम केली होती. मात्र दुर्देवाने ती असफल झाली. इंग्रजांनी सिद्धीला आश्रय दिला असल्याने शंभूराजेंना इंग्रजांशी थेट लढण्यापलिकेडे पर्याय नव्हता. डचांविरुद्ध मात्र तसं झालं नाही. मराठ्यांच्या आरमाराबाबत आणि व्यापार चलनाबाबत डच सत्तांची नेमकी काय भूमिका होती याचे पुरावे व्यावहारिक पत्रातून समोर येते.
वेंगुर्ल्यामध्ये डचांच्या वखारी मोठ्या प्रमाणात होत्या. या वखारीत बराच माल परदेशातून येत होता. भारताव्यतिरीक्त डचांच्या जपानमध्ये देखील वखारी होत्या. जपानमधून भारतात तांबे आयात केलं जात असे. म्हणूनच मराठ्यांनी डचांकड तांब्याची मागणी केल्याच्या नोंदी आहे. मराठे तांबे आयात करुन डचांचा सोन्याचे ठिपकी होन देत असे. आयात केललं तांबं हे मराठे व्यापारी चलनासाठी वापरत असे.मराठे आणि डच यांच्यातील या व्यवहाराच्या नोंदी डच पत्रव्यवहारात आढळून येतात. या ठिपकी होनातील शुद्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने व्यापारात डचांना तोटा सहन करावा लागत आहे, अशी तक्रार देखील डचांनी मराठ्य़ांना केली असल्याचे पुरावे आहेत.
युरोपीयन सत्तेचं शंभूराजेंच्या कार्यकाळात मराठ्यांशी संबंध कसे होते त्यांच्यातील व्यवहार आणि व्यापारी चलन नेमकं कसं होतं. त्याचबरोबर युरोपीयन सत्तेतील विशेष:डचांची मराठ्यांचा संबंध कसा होता. या युरोपीयन सत्तेशी शंभूराजेंनी नेमका काय तह केला आणि या तहामधील कलम काय होते याबाबत इतिहासकार निखिल बेल्लारीकर यांनी आपल्या लेखात मराठ्यांशी झालेल्या युरोपीयन सत्तांच्या पत्रव्यवहारांचे पुरावे दिले आहेत. युरोपीयन सत्तांशी महारांजांचे नेमक संबंध कसे होते, याचे सखोल वर्णन गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार साहित्य निर्मिती करणाऱ्या आणि वाचकांच्या बौद्धीक खाद्य पुरविणाऱ्या नवभारत ग्रुपचे मराठी दैनिक नवराष्ट्रने छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी “स्वराज्याचा छावा” हा विशेष अंक नवराष्ट्र तेजोत्सवच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.