Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यामध्ये शहाळ्याचे पाणी शरीराला आणि मानसिक आरोग्याला चालना देणारे अमृत

आपल्या दिनचर्येमध्ये हायड्रेट करणारे पदार्थ आणि पेये समाविष्ट करणे हा हायड्रेटेड राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लस्सी, शहाळ्याचे पाणी, फळांचा रस ही पारंपरिक भारतीय पेये रुचकर असते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2024 | 01:01 PM
उन्हाळ्यामध्ये शहाळ्याचे पाणी शरीराला आणि मानसिक आरोग्याला चालना देणारे अमृत
Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे हायड्रेशनला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. उष्ण आणि आर्द्रता जास्त असलेल्या कालावधीत शरीराचे आरोग्य आणि सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी सुयोग्य हायड्रेशन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डिहायड्रेशनची समस्या जाणवल्यानंतर आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. यामध्ये थकवा येणे, भोवळ,डोकेदुखी आणि आकलनक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. किंबहुना, संशोधनातून असेही दिसून आले आहे की, थोड्याशा डिहायड्रेशनमुळेसुद्धा आकलनक्षमतेवर प्रभाव पडतो. परिणामी, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि वृत्तीवर याचा परिणाम दिसून येतो. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (असोचॅम) या संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या अहवालात भारतातील मनुष्याला डिहायड्रेशनमुळे थकवा येत आहे. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. हे केवळ कामाबाबतच नाही तर तुमच्या व्यायामावर, लक्ष केंद्रीत करण्यावर आणि एकूणच आरोग्य कल्याणावर याचा परिणाम होतो. दररोज प्रत्येक पुरुषाने ३००० मिलि तर स्त्रीने २२०० मिलि द्रव पदार्थाचे सेवन पुरेसे असते, अशी शिफारस करण्यात येते.

[read_also content=”या राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात होतील आश्चर्यकारक बदल https://www.navarashtra.com/lifestyle/there-will-be-amazing-changes-in-the-love-life-of-the-people-of-this-zodiac-sign-532745.html”]

आपल्या दिनचर्येमध्ये हायड्रेट करणारे पदार्थ आणि पेये समाविष्ट करणे हा हायड्रेटेड राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लस्सी, शहाळ्याचे पाणी, फळांचा रस ही पारंपरिक भारतीय पेये रुचकर असतातच, त्याचप्रमाणे अत्यंत हायड्रेटिंग असतात.या सगळ्यात शहाळ्याचे पाणी सर्वाधिक नैसर्गिकपणे हायड्रेट करणारे आणि ताजेतवाने करणारे पेय आहे. या पोटॅशिअम, सोडियम यासारखे नैसर्गिकरित्या आवश्यक असलेले क्षार मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे लगेच ऊर्जा वाढते आणि घामावाटे जे इलेक्ट्रोलाइट्सची झीज होते ती लगेच भरून निघते. शहाळ्याच्या पाण्यामुळे कोलेस्टरॉलच्या पातळीचे संतुलन राखले जाते, रक्ताली शर्करा कमी होते, त्वचा, केसांसाठी ते चांगले असते आणि असे अनेक फायदे आहेत. या व्यतिरिक्त, त्यातील नैसर्गिक गोडव्यामुळे साखरयुक्त पेयांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

दिवसातील कोणत्याही वेळी शहाळ्याचे पाणी पिता येते. पण सकाळी किंवा व्यायाम केल्यानंतर शहाळ्याचे पाणी पिण्याची शिफारस करण्यात येते. सर्व वयोगटातील व्यक्ती आणि मुलांनीही हे पाणी प्यायलेले चालते. फक्त ज्यांच्या शरीरातील पोटॅशिअमची पातळी जास्त असते किंवा मूत्रपिंडाचा आजार असला तर त्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात शहाळ्याचे पाणी पिताना काळजी घ्यावी. शहाळ्याचे पाणी प्रत्येकासाठीच सहज उपलब्ध होईल, असे नाही. त्यामुळे बी नॅचरल सारखे ब्रँड शहाळ्याचे पाणी पॅकेज्ड स्वरुपात पेट बाटल्यांमधून उपलब्ध करून देत आहेत.

[read_also content=”यशस्वी लोक रोजच्या जीवनात ‘या’ नित्यक्रमांचे पालन करतात,स्वतःवर देखील करा लागू https://www.navarashtra.com/lifestyle/successful-people-follow-these-routines-in-their-daily-lives-apply-them-to-yourself-as-well-nrsk-532755.html”]

यात साखर घातलेली नसते आणि कृत्रिम स्वादही समाविष्ट नसतो. त्यामुळे ते सुरक्षित असते आणि प्रवासात असताना ते सहजपणे सोबत बाळगता येते.सुयोग्य हायड्रेशन हा चांगल्या मानसिक व शारीरिक कामगिरीचा आधारस्तंभ आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. संतुलित आहाराचा भाग म्हणून शहाळ्याच्या पाण्याचा समावेश केल्याने दिवसभर शरीर हायड्रेटेड आणि ऊर्जायुक्त राहील याची खातरजमा होते.

डॉ. भावना शर्मा, हेड – न्यूट्रिशन सायन्स, ITC लि. बी नॅचरल

Web Title: Shahala water is an elixir that promotes body and mental health in summer health nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • Drink

संबंधित बातम्या

थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन, खोकला आणि सर्दीने व्हाल हैराण
1

थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन, खोकला आणि सर्दीने व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.