Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ! जाणून घ्या महाराजांच्या कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. संपूर्ण राज्यभरात मोठ्या जलौषात शिवजयंती साजरा केली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळबदल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2025 | 03:31 PM
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ!

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ!

Follow Us
Close
Follow Us:

19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या जलौषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा केली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी वेशभूषा, भाषण, पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. इतिहासामध्ये त्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशभक्त तसेच कुशल प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांनी मुघलांचा पराभव करून मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. इतिहासातील सगळ्यात पराक्रमी आणि शूरवीर राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे.(फोटो सौजन्य – pinterest)

Chattrapati Shivaji Maharaj: शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झालाय ‘छावा’चा जन्म, ठेवा शिवरायांच्या नावावरून प्रेरीत नावं

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणत्याही जाती धर्मांमध्ये मतभेद केला नाही. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा अशी पदवी देण्यात आली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करणारे माहिती चित्रपट, नाटक इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ:

शिवाजी महाराजांचा जन्म:

19 फेब्रुवारी इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी डोंगरी किल्ल्यावर झाला. पूर्वीच्या काळात सांगण्यात आलेल्या आख्यायिकेनुसार, शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, त्यामुळेच या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली. तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आहे, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या.

संभाजी महाराजांचा जन्म:

शहाजी राजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. अफजल खानाने दगाफटका केल्यामुळे संभाजी 1655 साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नींची नावे:

  • निबांळ्कर घराण्यातील सईबाई निंबाळकर
  • मोहिते घराण्यातील सोयराबाई मोहिते
  • पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर
  • गायकवाड घराण्यातील सकवारबाई गायकवाड
  • शिर्के घराण्यातील सगुणाबाई शिर्के
  • जाधव घराण्यातील काशीबाई जाधव
  • विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें
  • इंगळे घराण्यातील गुणवंताबाई इंगळे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावे:

छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले आणि सहा मुली होत्या. सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. तर संभाजी, राजाराम, असे महाराजांच्या मुलांची नावे आहेत.

संभाजी महाराजांचा जन्म:

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1657 मध्ये झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई असे असून त्यांच्या मुलांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते.

राजाराम महाराजांचा जन्म:

राजाराम महाराजांचा जन्म 1670 साली झाला. त्यांच्या पत्नीचे नाव ताराबाई, जानकीबाई, आणि राजसबाई. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी महाराजांच्या मुलाला कोल्हापूर च्या गादीवर बसवलं होते.

chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म:

संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहु महाराज हे सातारा गादीचे संस्थापक आहेत. छत्रपती शाहू महाराज 1749 मध्ये निपुत्रिक वारले. त्यांच्या पश्चात दत्तकपुत्र रामराजा (ताराबाईचा नातू) राज्यावर आले. रामराजासुद्धा निपुत्रिक होते. त्यामुळे त्यांच्या जागी दुसरे शाहू महाराज हे दत्तक पुत्र गादीवर आले व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह छत्रपती बनले. साताऱ्याचे उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज मानले जाते. ते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र आहेत. तर शिवेंद्रराजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत. सध्या कोल्हापूर संस्थान शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे. युवराज संभाजी राजे त्यांचे चिरंजीव आहेत.

Web Title: Shivaji maharaj jayanti 2025 detailed information of chhatrapati shivaji maharaj family members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • chattrapati shivaji maharaj
  • Chhatrapati Shivaji maharaja
  • shivjayanti

संबंधित बातम्या

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी
1

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार
2

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.