निळा प्रकाश म्हणजे काय?
कोरोना महामारीमध्ये संपूर्ण जगाची अर्थव्यस्था विस्खलित झाली होती. ऑफिस बंद असल्यामुळे अनेकांना घरातून काम देण्यात आले होते. वर्क फ्रॉम होम दिल्यामुळे तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन काम करत बसावे लागत होते. अजूनही बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बराच वेळ बसून राहिल्यामुळे आरोग्यसोबतच डोळ्यांचे सुद्धा नुकसान होते. जास्त वेळ काम केल्यामुळे डोळे दुखण्यास सुरुवात होते. सतत लॅपटॉप घेऊन काम केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांमधून पाणी येणे, अंधुक दिसणे, डोळे लाल होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.
लॅपटॉप आणि मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश यासाठी दोषी असल्याचे अनेकदा बोलले जाते. निळ्या प्रकाशात जास्त वेळ राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांना त्रास होण्यास सुरुवात होते. डोळ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चष्मा घालतात. जेणेकरून डोळ्यांची दृष्टी चांगली राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निळा प्रकाश म्हणजे काय? डोळ्यांच्या आजारापासून डोळ्यांचे नुकसान होऊन म्हणून काय करावे? जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पांढरा प्रकाश वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरला गेल्यानंतर त्यांचे वेगवेगळे रंग तयार होतात. लाल , नळा आणि व्हायलेट अशा सर्व रंगाच्या छटांनी स्पेक्ट्रम तयार होते. तयार झालेले स्पेक्ट्रम अगदी इंद्र्धनुष्यासारखे दिसते. या स्पेक्ट्रममधील निळा आणि व्हायलेट रंग हा जास्त प्रकाशित असतो. म्हणजे हा प्रकाश ज्या गोष्टींवर पडतो तिथे जास्त लाईट निर्माण होते. प्रकाशाची ऊर्जा सगळीकडे पसरते. तसेच हा प्रकाश डोळ्यांना जास्त प्रभावित करतो.
हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी काय खावे?
निळा प्रकाश म्हणजे काय?
निळ्या प्रकाश डोळ्यांवर पडल्यानंतर संपूर्ण डोळ्याचे नुकसान होते. कॉर्नियाआणि डोळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर परिणाम दिसून येतो. तसेच डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यामध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतता. या समस्या काही वेळा गंभीर झाल्यानंतर दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. तसेच वय वाढल्यानंतर मोतीबिंदू किंवा काचबिंदू होऊ शकतो. निळा प्रकाश रेटिनावर पडल्यानंतर डोळ्यांचे नुकसान होते. यामुळे डोळ्यांना इजा पोहण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: ॲसिडीटी, पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पोट होईल स्वच्छ
शरीरामध्ये विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोळ्यांवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात पुष्टी पदार्थांचे सेवन करावे. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसल्यानंतर चष्मा वापरावा. काम करताना मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करावा लागत असल्यास 20-20-20 नियम पाळले पाहिजेत. 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर ठेवलेल्या वस्तूकडे पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.