Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

वाढलेले वजन फक्त शरीराला बाहेरूनच नाही तर आतूनही खराब करत असते. यामुळे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह अशा अनेक आजारांचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, जगभरात लठ्ठपणाने प्रमाण वाढत असून तो आता एक सायलंट किलर बनत चालला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 11:47 AM
Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरात सुमारे 1.8 अब्ज लोक पुरेशी शारीरिक हालचाल करत नाहीत.
  • भातातही लठ्ठपणाचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढले आहे.
  • संतुलित आहार आणि व्यायामाची मदत घेऊन लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
जगभरात आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत असून यातीलच एक समस्या म्हणजे लठ्ठपणा. हा एक सामान्य आजार वाटत असला तरी जगभरात असंख्य लोक याने ग्रस्त आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ३१ टक्के प्रौढ, किंवा अंदाजे १.८ अब्ज लोक आवश्यक शारीरिक हालचाली करू शकत नाहीत. ही आकडेवारी केवळ एक संख्या नाही तर येत्या काळात हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाच्या वाढत्या संख्येचे लक्षण आहे. वाढत चाललेले वजन आपल्या शरीराचे आरोग्य खराब करत असते. व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन लक्षणीयरित्या वाढू लागते. यामुळे थोडं जरी चाललं तरी धाप लागते, श्वास रोखला जातो. वाढलेल्या वजनाचा परिणाम आपल्या शारिरीक हालचालींवर दिसून येतो.

सुधागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश

२०१० ते २०२२ दरम्यान शारीरिक अनॲक्टिव्हीटी सुमारे ५ टक्क्यांनी वाढली आहे आणि जर ही गती अशीच राहिली तर २०३० पर्यंत ही संख्या ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते ही चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रौढांनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम किंवा ७५ मिनिटे जोरदार शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. अतिरिक्त वजन शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवर परिणाम करते, यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि स्तन आणि कोलन कर्करोग यासारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.

ही अवस्था भारतातही लक्षणीयरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये देशात लठ्ठपणा वेगाने वाढत असून त्यावर हवी तितकी गंभीर चर्चा अद्याप करण्यात आली नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, भारतातील जवळजवळ चार प्रौढांपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहे. म्हणूनच वजन वाढणे आणि संबंधित आजार भारतासाठी एक सायलंट किलर बनत चालला आहे. काही ठिकाणी लठ्ठपणाचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत कमी आहे, तर काही ठिकाणी ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. शहरे तसेच खेड्यांमध्ये पुरुष आणि महिला दोघेही या स्थितीने ग्रस्त आहेत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, देशातील लाखो लोक पोटातील लठ्ठपणा, सामान्य लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. गेल्या १५ वर्षांत भारतात जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांची संख्या दुप्पट झाली आहे आणि गेल्या ३० वर्षांत ती तिप्पट झाली आहे. सर्वात चिंताजनक म्हणजे, भारतात १.४४ कोटींहून अधिक मुले लठ्ठ आहेत, ज्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

डॉक्टरांच्या मते, लठ्ठपणा ही केवळ वजन वाढण्याची समस्या नाही. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्लीप एपनिया आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होणे हे सर्वात धोकादायक मानले जाते. आपली बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ही या वाढत्या समस्येमागील प्रमुख कारणे आहेत. शहरीकरण, जास्त वेळ बसून काम करणे, कमी शारीरिक हालचाली आणि प्रक्रिया केलेल्या आणि फास्ट फूडचे अधिक सेवन यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. WHO च्या मते, भारतातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या पुरेसा व्यायाम करत नाही. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, लोकांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे आणि स्क्रीन टाइम वाढला आहे.

महागड्या क्रीम लावण्याऐवजी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा त्वचेसाठी वापर, चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावं?

तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या आहारात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणा. तळलेले फास्ट फूड, प्रोसेस फूड आणि जास्त साखरेचे पदार्थ खाणे टाळा. आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करा जसे की, डाळी, कडधान्ये, सोयाबीन, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, ओट्स, क्विनोआ, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या.
वजन कमी करण्यासाठी फक्त आहारच नाही तर शारीरिक हालचाल देखील महत्त्वाची आहे. जलद चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योगासनांचा आपल्या रोजच्या जीवनात समावेश करा.
सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस पिलियासचयापचय वाढवण्यास आणि चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: 1 billion people worldwide are victims of obesity this is becoming a silent killer in india lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • obesity
  • Weight loss

संबंधित बातम्या

Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि लैंगिक आरोग्य, गैरसमज टाळा; आरोग्याचा मार्ग निवडा!
1

Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि लैंगिक आरोग्य, गैरसमज टाळा; आरोग्याचा मार्ग निवडा!

प्रसूतीनंतर गर्भाशय तपासणी टाळणाऱ्या मातांच्या संख्येत वाढ,  बाळाच्या संगोपनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
2

प्रसूतीनंतर गर्भाशय तपासणी टाळणाऱ्या मातांच्या संख्येत वाढ, बाळाच्या संगोपनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं
3

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
4

तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.