तेलकट किंवा जास्त तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी आणि पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात होते. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ पचनास जड असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात किंवा इतर वेळी जास्त प्रमाणात तेलकट तिखट पदार्थ खाऊ नये. अनेकदा सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कोणतेही अन्नपदार्थ खाल्ले तर गॅस, अपचन, आणि अॅसिडिटीचा त्रास होण्यास सुरुवात होते. या आजारांमुळे शरीर अस्वस्थ होऊन दिवसभराच्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे ॲसिडीटी पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटीचा त्रास कमी होईल.(फोटो सौजन्य-istock)
पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारते. खजूरमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. वजन कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी गुणकारी आहे. कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीरातील अॅसिडिटीचे प्रमाण कमी होते.
चवीला गोड असलेला पपई खाल्ल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले एन्झाइम पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसेच सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यामुळे पचनसंस्था सुधारते.
फायबरने समृद्ध असलेले ओटस खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. ओट्स खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट स्वच्छ होते. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.
बटाट्यामध्ये विटामिन ए, बी, सी, के, लोह, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम यांसारखी गुणधर्म आढळून येतात. यामुळे अॅसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा पोटातील अवयवांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.