Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेलमधून मिळणारे काळे डब्बे तुम्ही पुन्हा वापरतात? वेळीच राहा सावध अन्यथा तुमचा जीव धोक्यात…

बाहेरून खाद्यपदार्थ मागवताना, तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे बहुतेक रेस्टॉरंटमधून काळ्या प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर अन्न पोहोचवण्यासाठी केला जातो. गेल्या एका वर्षात भारतात त्यांचा वापर झपाट्याने वाढला आहे, याचा अधिक वापर तुमचे आरोग्य धोक्यात आणू शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 03, 2024 | 09:35 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली स्वीगी आणि झोमॅटो मुळे अनेक जण ऑनलाइन फूड ऑर्डर करत आहे. यामुळे हॉटेलवाल्यांचा धंधा एकदम जोरात सुरु आहे. पण अनेक वेळा आपण बघतो की हॉटेलवाले पार्सल जेवण एक काळ्या डब्ब्यात पॅक करून देत असतात. हे काळे बॉक्स म्हणजेच कंटेनर अतिशय सोयीस्कर आहेत, ज्यामध्ये अन्न सहजपणे पॅक केले जाऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की हे स्वस्त आणि सोयीचे कंटेनर तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.

शास्त्रज्ञांना या कंटेनरमध्ये ‘डेकाब्रोमोडिफेनिल इथर’ नावाचे धोकादायक रसायन सापडले आहे. आग पसरू नये म्हणून या रसायनाचा वापर केला जातो. म्हणून याला ‘फ्लेम रिटाडेंट्स’ असेही संबोधिले जाते. आगीचा प्रसार रोखण्याच्या क्षमतेमुळे त्यात गरम अन्न सहजपणे पॅक करून पाठवता येते.

हे देखील वाचा: चिकन कि पनीर? आरोग्यास जास्त पोषक ठरतो ‘हा’ खाद्यपदार्थ, जाणून घ्या

कंटेनर मध्ये असणाऱ्या गरम अन्नामुळे ही रसायने वितळतात आणि अन्नामध्ये मिसळतात, जे नंतर आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. या प्लास्टिकच्या गंभीर आरोग्य समस्यांमुळे अमेरिकेने 2021 मध्ये त्यावर बंदी घातली होती. मात्र भारतात या प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. परिणामी अनेक आजारांचा धोका वाढला आहे.

काळे प्लास्टिक का आहे धोकादायक?

लहान मुलांवर होतो परिणाम: या काळ्या प्लॅस्टिकमध्ये असलेले ‘डेकाब्रोमोडिफेनिल इथर’ लहान मुलांच्या विकासात अडथळा आणू शकते. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेलाही हानी पोहोचते.

आरोग्यावर परिणाम: हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्या ग्लैंड- एंडोक्राइनवर या रसायनाचा नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे थायरॉईड रोगाचा धोका वाढतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होतो.

कर्करोगाचा धोका: एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांच्या रक्तात फ्लेम रिटाडेंटचे प्रमाण जास्त होते त्यांना कर्करोगा होण्याचा धोका 300 टक्के जास्त असतो. काळ्या प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या ‘पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन’ नावाच्या रसायनामुळेही कर्करोगाचा धोका निर्माण होतो. या रसायनामुळे श्वसनाचा त्रासही उद्भवू शकतो.

आता तुम्ही काय करू शकता?

काळ्या प्लास्टिकचे कंटेनर वापरू नका – रेस्टॉरंटमधील काळ्या कंटेनरचा पुन्हा वापर करू नका. अन्न मायक्रोवेव्ह करण्यासाठी नेहमी काचेची भांडी वापरा. अन्न दुसर्यांना देताना स्टील किंवा काचेच्या भांड्याचा वापर करा.

घरात स्वच्छता ठेवा: घरातील धूळ नियमितपणे स्वच्छ करा आणि हात धुवा.

वेंटिलेशनची काळजी घ्या: घरात हवेचा संचार कायम ठेवा.

Web Title: Side effects of black plastic food packaging box

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:35 PM

Topics:  

  • Restaurants

संबंधित बातम्या

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
1

MSRTC: “फसवणूक केल्यास FIR दाखल करून…”; एसटी बसेसच्या हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !
2

Social कडून Mumbai Local Heroes मेन्यू लाँच, पदार्थ असे जे तुम्ही कधी पाहिलेच नसेल !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.