फोटो सौजन्य - Social media
शाकाहारी माणसे त्यांच्या आहारामध्ये जास्त पनीरचे सेवन करतात. तर मांसाहारी लोकांमध्ये कोंबडीचे मास खाण्याची सवय जास्त आढळून येते. पनीर आणि चिकनमध्ये नेहमी वादविवाद होत असतात. शाकाहारी माणसे पनीरला चिकनहून अधिक निरोगी मानतात. तर मांसाहारी माणसांना मांसापेक्षा जास्त निरोगी आणि पोषक इतर काहीच वाटत नाही. पाहायला गेले तर, चिकन आणि पनीर दोघेही शरीरासाठी खूप पोषक असतात.
हे देखील वाचा : पूजेत वापरण्यासाठी बताशा घरी कसा बनवायचा, जाणून घ्या सोपी पद्धत
चिकनमध्ये प्रथिने भरपूर असतात. १०० ग्राम चिकनमध्ये ३० ग्राम इतके प्रथिने असतात. हे प्रथिने शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. तसेच शरीरातील ऊर्जेच्या पातळीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. चिकनमध्ये लोह, झिंक, आणि व्हिटॅमिन B12 सारखी पोषकतत्त्वे सापडतात, जी शरीरातील रक्तनिर्मितीसाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कमी फॅट असलेले चिकन वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे, विशेषतः ग्रिल्ड किंवा उकडलेले चिकन वेट लॉससाठी फायद्याचा आहे.
पनीर हा दुगजन्य पदार्थ आहे. यामध्ये प्रथिनांसह कॅल्शिअमचा साठा मोठा आहे. १०० ग्राम पनीरमध्ये १`८ ते २० ग्राम प्रथिने असतात, जे चिकनच्या तुलनेत कमी आहेत पनीरमध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते, तसेच हा पचनसंस्थेसाठी लाभदायक ठरतो. पनीरचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, विशेषतः जर ते लो-फॅट पनीर असेल.
हे देखील वाचा : केस कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा कापूरचा वापर, केस होतील मऊ
जर वजन कमी करण्याचा उद्देश असेल तर चिकन जास्त उपयोगी ठरते. लो फॅट चिकन खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच चिकनमध्ये पनीरच्या तुलनेत जास्त प्रथिने असतात. अधिक प्रथिनेयुक्त असल्याने शरीरासाठी फार लाभकारी असते. परंतु, उद्देश हाडांना मजबुती देण्याचा आहे. तर पनीर कधीही उत्तम असते. पनीरमध्ये असलेले कॅल्शिअम हाडांच्या मजबुतील कारणीभूत असते. पनीरमध्ये फॅट्सचे प्रमाणही जास्त असते. प्रथिनांच्या वाढीव गरजांसाठी, दोन्ही पर्याय चांगले आहेत, परंतु तुमचे ध्येय आणि जीवनशैली पाहून निर्णय घ्यावा. जीवनशैली फार महत्वाचा विषय असल्याने त्यानुसार आपले खाद्यपदार्थ निवडा. चिकन आणि पनीर दोन्ही आपल्या आरोग्यसाठी पोषक आणि चांगले आहेत. आपल्या गरजेनुसार पर्याय निवडणे कधीही फायद्याचे ठरेल.