अंबाडीच्या बियांचे दुष्परिणाम
अंबाडीच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला भरभरून फायदे होतात, असे अनेकदा आपण ऐकले असेल. अंबाडीच्या बियांमध्ये असलेले पौष्टीक घटक आरोग्यासाठी गुणकारी आहेत. अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी असिड आढळून येते, ज्यामुळे त्वचाआणि केसांच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन यांसारखे पौष्टिक घटक आढळतातत. सर्व गुणांनी समृद्ध असलेल्या बिया मात्र काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अंबाडीच्या बिया खाल्ल्याने जसे आरोग्याला फायदे होतात, तसेच अंबाडीच्या बिया खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अंबाडीच्या बियांचे कोणत्या लोकांनी सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
अनेक रोगांवर रामबाण उपाय असलेल्या अंबाडीच्या बिया बद्धकोष्ठतची समस्या असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतात. आतड्यांसंबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर अंबाडीच्या बियांचे सेवन करू नये. तसेच या बियांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्यसंबंधित समस्यानिर्माण होऊ शकतात.
हे देखील वाचा: जरा काय धावलात तर श्वास घेण्यास त्रास होतो? तर मग ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा
अंबाडीच्या बिया गरम असल्यामुळे गर्भधारणेच्या वेळी या बियांचे सेवन करू नये. अन्यथा आरोग्यसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेच्या वेळी अंबाडीच्या बिया खाल्ल्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये असलेले इस्ट्रोजेन गुणधर्मांमुळे हार्मोनल असंतुलित होण्याची शक्यता असते.
अंबाडीच्या बियांचे दुष्परिणाम
अंबाडीच्या बिया खाल्ल्यामुळे अलर्जी होण्याची शक्यता असते. कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी अंबाडीच्या बियांचे सेवन करू नये, अन्यथा रक्त दाबामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पोटदुखी आणि अस्वस्थता निर्माण होते.
हे देखील वाचा: कमी वेळात बनणारा टेस्टी नाश्ता; ब्रेड आणि पनीरची परफेक्ट डिश
अंबाडीच्या बियांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. अतिसाराचा त्रास होत असलेल्या लोकांनी अंबाडीच्या बिया खाऊ नयेत.