Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 01:09 PM
फुप्फुसात म्यूकस वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

फुप्फुसात म्यूकस वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Follow Us
Follow Us:

प्रदूषणापासून फुप्फुसांचे संरक्षण करणारा श्लेष्म (म्युकस) जास्त प्रमाणात साचल्यास उलट धोका वाढतो आणि दमा व अ‍ॅलर्जीचे झटके तीव्र होऊ शकतात, असें महत्त्वाचे संशोधन आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी काढला आहे. मुंबईतील सततच्या प्रदूषण पार्श्वभूमीवर या अभ्यासामुळे श्वसनमार्गातील आजारांची कारणमीमांसा स्पष्ट होत असून भविष्यातील औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना नवी दिशा मिळण्याची मोठी शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान, आपल्या फुप्फुसांतील श्वसनमार्गामध्ये नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणून श्लेष्म (म्युकस) सतत स्त्रवत असतो. बाहेरील सूक्ष्म कण, धूळ, काजळी किंवा अ‍ॅलर्जेन आत शिरताच हा श्लेष्म त्यांना पकडून ठेवतो.(फोटो सौजन्य – istock)

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

मात्र आयआयटी मुंबईच्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, प्रदूषणाच्या सततच्या संपर्कामुळे श्वसनमार्गांमध्ये श्लेष्माचे प्रमाण वाढले तर संरक्षण मजबूत होण्याऐवजी ते कमकुवत ठरते. संशोधकांच्या अभ्यासात असे आढळून आले की अतिरिक्त श्लेष्म श्वसनमार्गांमध्ये सलग आवरण तयार करत नाही, तर ठिकठिकाणी अरुंद उंचवटे आणि गुठळ्या निर्माण होतात. परिणामी काही भाग पूर्णपणे उघडे राहतात. या उघड्या भागांवर अतिसूक्ष्म प्रदूषणकण साचण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे दमा, अ‍ॅलर्जी व इतर श्वसनविकारांचा धोका अधिक होतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईचे संशोधक स्वर्णादित्य हाजरा आणि प्रा. जेसन आर. पिकार्डो यांनी केला आहे.

संशोधन ‘मध्य श्वसनमार्गा’ वर केंद्रित:

संशोधन प्रामुख्याने ‘मध्य श्वसनमार्गा’वर केंद्रित आहे. हे मार्ग श्वासनलिका आणि फुप्फुसांतील शेवटच्या वायुकोशांदरम्यान असतात. या भागात श्लेष्माचे आवरण भौतिकशाखीयदृष्ट्या ‘रेली-प्लॅटो अस्थैर्य या सिद्धांतानुसार वर्तन करते. त्यामुळे श्लेष्म एकसंध न राहता ठिकठिकाणी गोळा होतो आणि संरक्षणात खंड पडतो.

हे संशोधन कोणाला कसे उपयोगी?

दमा आणि अ‍ॅलर्जीच्या झटक्यांचे भौतिकशास्त्रीय कारण समजण्यास मदत
प्रदूषित शहरांतील नागरिकांसाठी आरोग्यधोका अधिक स्पष्ट
श्वसनाद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांचे अचूक डिझाइन करण्यासाठी मार्गदर्शन
डिझायनर औषधकाण’ विकसित करून औषध थेट आवश्यक ठिकाणी पोहोचवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेला प्रभावी उपाय

साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते. त्यामुळे श्वसनमार्गाचे काही भाग उघडे पडतात आणि अतिसूक्ष्म प्रदूषणकण सहजपणे आत शिरू शकतात. हा खरा ‘म्युकस पॅराडॉक्स’ आहे. प्रा. जेसन आर, चिकार्डी, केमिकल इंजिनियरिंग विभाग, आयआयटी मुंबई, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. संशोधकांच्या मते, फुप्फुसांच्या संपूर्ण प्रणालीचे सर्वकष मॉडेल तयार करणे हे पुढील उद्दिष्ट असून, या अभ्यासामुळे श्वसनमार्गातील आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Increased risk of mucus in the lungs medicines and treatment methods will get a new direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.