
सध्याच्या फॅशन युगात अनेक नवनवीन कपड्यांचे, चपलांचे नवीन ट्रेन्ड आले आहेत.अनेक महिलांना उंच टाचेच्या चपला घालणं फारच आवडत. फॅशनचा खरा अर्थ म्हणजे आरामदायी आणि शरीराला शोभतील असे कपडे वापरून फॅशन करणं. अनेक मुली जश्या कपड्यांवर अनेक नवनवीन प्रयोग करतात तसाच प्रयोग चपलांवर सुद्धा केला जात आहे.उंच टाचेच्या चपला घातल्यानंतर आपला लूक अत्यंत छान आणि स्टयलिश दिसतो. पण उंच टाचेच्या चपला आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
उंच टाचेच्या चपलांमुळे पाय आणि पाठीच्या आजाराच्या समस्या वाढू शकतात. अनेकदा दिवसभर उंच टाचेच्या चपला चालून बाहेर फिरल्यानंतर काही तासांनी पायाचा तळवा दुखण्यास सुरुवात होते. हळूहळू हे दुखणं पाठीपर्यंत वाढत जात. त्यामुळे रोजच्या वापरात चपला निवडताना योग्य त्या चपला निवडाव्या. ज्यामुळे पाठ दुखी किंवा पाय दुखीसारख्या समस्या उद्भवणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला उंच टाचेच्या चपला घातल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया उंच टाचेच्या चपला घातल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात.(फोटो सौजन्य- Istock)
उंच टाचेच्या चपला घातल्याने होणारे दुष्परिणाम:
पाठदुखी:
उंच टाचेच्या चपला घातल्यानंतर हळूहळू पाठी दुखीचा त्रास जाणवू लागतो. शरीरसंबंधित समस्या वाढत जातात. उंच टाचेच्या चपलांमुळे शरीरातील गुरुत्वाकर्षणाचे केंद्र खाली सरकते आणि पाठ दुखण्यास सुरुवात होते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात पाठ दुखण्यास सुरुवात होते.
[read_also content=”नोकरीत यश आणि नकारात्मक होईल छूमंतर, करा कापूरचा असा वापर https://www.navarashtra.com/latest-news/let-us-know-what-camphor-can-be-used-for-543487.html”]
पायाची बोटे दुखणे:
चुकीच्या चपला वापरल्याने आणि उंच टाचेच्या चपला घातल्याने काही वेळानंतर पायाची बोटे दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे योग्य पद्धतीच्या चपला वापरणं आवश्यक आहे.
गुडघेदुखी:
उंच टाचेच्या चपला घातल्याने अनेकदा गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागतो. पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. उंच टाचेच्या चपला गुडघ्यांच्या मागील भागामध्ये दबाव टाकण्यास सुरुवात करतात. तसेच गुडघ्यांच्या सांध्यांवर संकुचित शक्ती निर्माण होते.
पायाच्या पंज्यांमध्ये तीव्र वेदना होणे:
उंच टाचेच्या चपला जास्त वेळ घातल्यानंतर पायाचा पंजा दुखू लागतो. यामुळे पायाची बोटे अनैसर्गिक स्थितीमध्ये राहतात. यामुळे पंजांमधील वेदना वाढू लागतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.