फोटो सौजन्य - Social Media
मुंबई, नीता परब: भायखळा स्थित राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या सर जे.जे. रुग्णालय १८० व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन टप्पे गाठत आहे. रुग्णालयाचे विविध विभाग नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालत विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाने बुलढाणा येथील रहिवाशी असलेला एक ३२ वर्षीय लकवा झालेल्या तरुणाच्या मान, पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला नव जीवनदान दिले आहे. ज्यामुळे आता त्या तरुणाला चालणे- फिरणे शक्य झाले आहे.
सव्हार्यकल स्पाईन क्षयराेगाने त्रस्त
बुलढाणा येथील वास्तव्यास असलेला एक ३२ वर्षीय तरुण कॅटरिंगचा व्यवसाय करताे, ताे मागील काही दिवसांपासून सव्हार्यकल स्पाईन क्षयराेगाच्या त्रासाने त्रस्त हाेता, ज्यामुळे त्याला लकवाही झाला हाेता. त्याच्या मानेची हाडेही कमजाेर झाली हाेती, दरम्यानच्या काळात या आजारपणामुळे त्याला चालता – फिरता काहीही येत नव्हते ज्यामुळे ताे अंथरुणाला खिळून हाेता. बुलढाणा येथील बऱ्याच डाॅक्टरांकडे उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ज्यामुळे त्याला मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल हाेण्याचा सल्ला दिला. सदर तरुण जे.जे. रुग्णालयाच्या अिस्थव्यंग विभागात दाखल झाल्यानंतर त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. ज्यात त्याच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अिस्थव्यंग विभागाने घेतला.
३२ वर्षीय तरुणाला मिळाले नवजीवन
मान व पाठीच्या (सर्व्हायकल स्पाईन) क्षयरोगामुळे त्याला लकवा झाला हाेता. ज्यामुळे हातापायांना अशक्तपणा आल्याने ताे चालू शकत नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे हे अस्थिव्यंग विभागातील डाॅक्टरांसमाेर एक आव्हानं हाेते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ.संजय सुरासे तसेच वरिष्ठ डाॅ. संगीत गव्हाळे व डाॅ.कुशाल गाेहिल व अन्य डाॅक्टरांच्या टिमने सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने (मायक्रोस्कोपिक डिकंप्रेशन व प्लेटिंग) मान व पाठीच्या कण्यावर गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली आजघडीला सदर तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकताे शिवाय ताे चालू शकताे.
सर जे.जे. रुग्णालय समूहाने १८० वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण व तंत्रज्ञान,तसेच यशस्वी शस्त्रक्रियांमध्ये नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे. अत्याधुनिक यशस्वी शस्त्रक्रिया माफक दरात करण्याचा ।आमचा सातत्याने कल असताे, त्यादृष्टीने सर जे.जे. समूह नेहमी कार्यरत राहणार आहे.