सार्वजनिक गणेशोत्सवात सकाळी आणि रात्री मोठ्या जोशात आरती केली जाते. काही मंडळांचे कार्यकर्ते महाआरत्यांचेही नियोजन करतात. सर्वच आरत्यांना परिसरातील नागरिक गर्दी करतात. त्यांना प्रसाद म्हणून मोदक, विविध प्रकारची मिठाई वाटली जाते. त्यासाठी पाचपासून २१ किलोपर्यंत मंडळांचे कार्यकर्ते मोदक, मिठाई दररोज नेतात. यातून हलवायांची मोठी उलाढाल होते. मात्र, सार्वजनिकरित्या उत्सव साजरे करण्यावर बंधने असल्याने प्रसादासाठी जास्त मोदक, मिठाई जाणार नसल्याने सर्वच मिठाई विक्रेत्यांनी सध्या पदार्थ सावधगिरीने जेमतेम करत असल्याची माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली.
यंदा वाढलेले इंधनाचे दर, त्याचा वाहतूक दरावर झालेला परिणाम आणि कोरोनाचे सावट यामुळे कच्च्या मालात काही प्रमाणात वाढ झाली आहे. खव्याचे दर किलोला ३० ते ४० रुपयांनी वाढले असले तरी मोदकांच्या दरात फारशी वाढ केलेली नाही.