
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोनमने ही आनंदाची बातमी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. तिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या दुसऱ्या मातृत्वाचा प्रवास आणि हॉस्पिटलमधील अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोनमने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, हा संपूर्ण प्रवास तिच्यासाठी अत्यंत सुखद आणि सुरक्षित होता.
सोनम कपूरने आपल्या प्रसूतीदरम्यान मिळालेल्या वैद्यकीय सेवेचं बरंच कौतुक केले आहे. तिने आपली प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ Dr. Avaan Dadina यांचे विशेष आभार मानले. सोनम म्हणाली की, “माझ्या दोन्ही गर्भधारणांच्या काळात डॉक्टरांनी दिलेले मार्गदर्शन मोलाचे होते. त्यांच्यामुळेच मला या काळात विश्वास, शांतता आणि मोठा दिलासा मिळाला. त्यांच्याकडे असलेले अफाट ज्ञान आणि रुग्णाप्रती असलेली संवेदनशीलता फारच महत्त्वाची आहे.”
Reliance Foundation Hospitalमधील अनुभवाबद्दल बोलताना सोनमने सांगितले की, येथील सेवा “प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट” होती. केवळ डॉक्टरच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय टीमने तिची ज्या पद्धतीने काळजी घेतली, त्यामुळे हा प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला. टीममधील प्रत्येकाची रुग्णाशी असलेले सहानुभूतीपूर्ण वर्तन यामुळे प्रसूतीचा काळ तणावमुक्त राहण्यास मदत झाली, असे तिने नमूद केले.
सोनमने ही पोस्ट शेअर करताच बॉलीवूडमधील सेलिब्रिटी आणि जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. अनिल कपूर पुन्हा एकदा आजोबा झाल्यामुळे प्रचंड आनंदी असून त्यांनीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना आधी ‘वायू’ नावाचा मुलगा आहे. आता त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.