श्री श्री रवी शंकर यांचा गरोदर महिलांना सल्ला (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
गर्भधारणा हा एक अतिशय रंजक प्रवास आहे आणि तो प्रत्येक महिलेसाठी नक्कीच वेगळा आहे. त्यात आनंद असला तरी दुसरीकडे ते आव्हानात्मकदेखील आहे. या काळात, गर्भवती महिलेला प्रत्येक लहानसहान गोष्टीची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून आई आणि बाळ निरोगी आणि सुरक्षित राहतील. कुटुंबातील वडीलधारी व्यक्तीदेखील गर्भधारणेदरम्यान विविध प्रकारचे सल्ले देतात, जे गर्भवती महिलेने पाळले पाहिजेत.
या नऊ महिन्यात महिलेला स्वतःसह बाळाच्या आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. अगदी उठण्याबसण्यापासून ते खाण्याकडे, व्यायामाकडे प्रत्येक गोष्टींकडे लक्ष काटेकोरपणे पुरवावे लागते. यावेळी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी गर्भवती महिलांसाठी काही टिप्स दिल्या आहेत, ज्या कदाचित तुमच्या आजीनेही तुम्हाला सांगितल्या नसतील. महिलांनी त्यांच्या निरोगी गर्भधारणेसाठी हे निश्चितपणे पाळले पाहिजे. गर्भवती महिलांना श्री श्री रविशंकर यांचा सल्ला काय आहे ते जाणून घेऊया
गाणी ऐकावीत
चांगली गाणी ऐकणे गरजेचे
श्री श्री रविशंकर म्हणाले की गर्भवती महिलांनी संगीत ऐकावे. हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः जर तुम्ही झोपण्यापूर्वी वाद्य संगीत ऐकले तर तुम्हाला बरे आणि सकारात्मक वाटेल. अनेकदा गर्भवती महिलांना पहिले सहा महिने मूड स्विंग्जचा सामना करावा लागतो आणि अशावेळी चांगली गाणी ऐकणे हे महिलांच्या मूडसाठी आणि तुलनेने बाळासाठीही अत्यंत चांगले ठरते. संपूर्ण ९ महिने तुम्ही देवाची वा सकारात्मक गाणी ऐकलीत तर त्याचा बाळावरही चांगला परिणाम होत असल्याचे दिसून येईल
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
भयपट पाहू नका
श्री श्री रविशंकर यांनी गरोदरपणात भयपट चित्रपट न पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, गर्भवती महिलांनी असे दृश्ये पाहू नयेत ज्यात खूप भांडणे होतात. तसेच अशी दृश्ये पाहणे टाळा ज्यानंतर तुम्हाला लाज वा भीती वाटेल. आपण जे पाहतो आणि करतो त्याचा बाळावर परिणाम होत असतो. त्यामुळे ९ महिन्यात सातत्याने सकारात्मक रहा आणि भयपट पाहणे टाळा
कपड्यांचा रंग महत्त्वाचा
गरोदरपणात कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि टाळावे
श्री श्री रविशंकर यांच्या मते, गर्भवती महिलांसाठी हिरवा रंग चांगला मानला जातो. गरोदरपणात महिलांनी शक्य तितके हिरवे कपडे घालावेत. एवढेच नाही तर तुमच्या सभोवतालच्या हिरव्या रंगाच्या वस्तूंचाही समावेश करण्याचा प्रयत्न करा आणि लाल रंग परिधाना करणे टाळा. अर्थात, लाल रंग हा महिलांचा आवडता रंग आहे, परंतु या काळात महिलांनी राखाडी आणि लाल रंगांपासून दूर राहावे. कारण हे दोन्ही रंग गर्भवती महिलेच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतात.
गरोदर महिलांसाठी हळदीच्या दुधाचे ‘हे’ फायदा वाचाल तर चकित व्हाल
अन्य सल्ले
काय सांगतात श्री श्री रवी शंकर