(फोटो सौजन्य: Pinterest)
फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच
१६ व्या शतकाचा अनोखा इतिहास
ही ऐतिहासिक वास्तू १५७२ ते १५७७ दरम्यान, माल्टावर राज्य करणाऱ्या आणि ख्रिस्ती धर्माच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका शक्तिशाली धार्मिक आणि लष्करी संघटनेने बांधली होती. या चर्चची रचना माल्टी वास्तुविशारद गिरो लामो कसार यांनी केली होती. सुमारे पाच वर्षांत पूर्ण झालेली ही वास्तू आजही त्याच्या भक्कमतेसाठी आणि अनोख्या कारागिरीसाठी जगभर ओळखली जाते. ही वास्तू जगभरातील पर्यटकांना याकडे आकर्षित करते.
सोन्याचे कोरीवकाम
या कॅथेड्रलमध्ये पाऊल ठेवताच त्याच्या भव्यतेने लोकांचे डोळे दिपून जातात. बाहेरुन दिसायला साधं, पण आतून दिसायला मात्र ही वास्तू फारच सुंदर आणि दर्जेदार दिसते. आतील भिंती आणि छत नाजूक सोन्याच्या कोरीव कामाने सजलेले आहेत. यावरील सोन्याचे काम त्याचबरोबर छतावरील बायबलमधील कथा दर्शवणारी सुंदर चित्रे यामुळे ही जागा एका कलादानाचा अनुभव देते.
संगमरवरी फरशीत योद्धे लपलेले आहेत
या चर्चेचे आणखीन एक प्रमुख वैशिष्य म्हणजे, त्याची फरशी. या वास्तूतील संपूर्ण फरशी ही संगमरवरी असून त्यावर ४०० हून अधिक कबरी आहेत. सांगण्यात येते की, या कबरी सेंट जॉनच्या शूरवीरांच्या महान योद्ध्यांच्या आणि उच्च अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी त्याच्या काळात संघटनेची आणि धर्माची सेवा केली. फक्त धार्मिक श्रद्धाच नाही तर कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.
या पवित्र ठिकाणी पार पडला होता राधा- कृष्णाचा विवाहसोहळा, स्वतः ब्रह्मदेवाने केले होते धार्मिक विधी
संत जॉन बाप्टिस्ट यांच्या शिरच्छेदाचे चित्र
या चर्चमधील सर्वात माैल्यवान गोष्ट म्हणजे, महान इटालियन चित्रकार कॅराव्हॅगिओ यांचे एक प्रसिद्ध चित्र. १६०८ मध्ये या चित्राला तयार करण्यात आले होते ज्याला ‘सेंट जॉन द बॅप्टिस्टचा शिरच्छेद’ या नावाने ओळखले जाते. यात शिरच्छेदाचा थरारक क्षण, रक्ताचे लाल रंग आणि कॅरावॅगिओची सही असलेला रक्ताचा डाग अशी प्रमुख वैशिष्ट्ये दाखवण्यात आली आहेत. हे कॅराव्हॅगिओच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानले जाते. कॅथेड्रलचे प्रमुख आकर्षण म्हणून याची ओळख आहे.






