Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strawberry Mango Overnight Oats: चवीला आरोग्याची जोड, सकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्राबेरी मँगो ओव्हरनाईट ओट्स

एक आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा नाश्ता! स्ट्रॉबेरीचा आंबटपणा, हापूस आंब्याची गोड चव आणि ओट्समधील पौष्टिक गुण तुमच्या सकाळच्या नाश्त्याला आणखीनच परफेक्ट बनवते. स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 04, 2025 | 02:32 PM
Strawberry Mango Overnight Oats: चवीला आरोग्याची जोड, सकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्राबेरी मँगो ओव्हरनाईट ओट्स

Strawberry Mango Overnight Oats: चवीला आरोग्याची जोड, सकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्राबेरी मँगो ओव्हरनाईट ओट्स

Follow Us
Close
Follow Us:

सकाळचा नाश्ता पौष्टिक, चवदार आणि झटपट हवा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. उन्हाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत बाजारात अनेक सिजनल फ्रुट्स येतात. यापैकीच एक लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. याला फळांचा राजाही म्हटले जाते… तर याच फळांच्या राजापासून आज आपण एक पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता तयार करणार आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे स्ट्राबेरी मँगो ओव्हरनाईट ओट्स! नावाप्रमाणेच सहज, सोपा आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस, नोट करा रेसिपी

आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी ही रेसिपी शेफ ‘मझहर सैय्यद’ यांनी शेअर केली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. पारंपरिक पोळी-भाजी किंवा उपमा-शिरा यासारख्या नाश्त्यांइतकीच ही नवीन पद्धतीची रेसिपी शरीराला भरपूर ऊर्जा देते. कोणत्याही कृत्रिम गोष्टींचा वापर न करता, घरच्या घरी सहज बनवता येणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल. आंबा आणि स्ट्रॉबेरी या गोडसर फळांच्या संगमामुळे याला एक फ्रेश आणि ट्रॉपिकल चव मिळते आणि ओव्हरनाइट ओट्स तुम्हाला ऊर्जा देणारे आणि पचनास हलके ठरते. चला तर मग, झोपण्याआधी काही मिनिटांतच हे हेल्दी ओट्स तयार करून, सकाळी एक स्वादिष्ट सुरुवात करूया!

साहित्य

  • १ कप ओट्स
  • १ टेबलस्पून चिया सीड्स
  • ½ कप स्ट्रॉबेरी ग्रीक दही
  • ¼ कप बदामाचे दूध
  • १ टेबलस्पून स्ट्रॉबेरी शॉर्टकेक काजू बटर
  • १ संपूर्ण आंबा, चिरलेला
  • १ कप ताजे स्ट्रॉबेरी, चिरलेली

French Toast: फ्रांसचा नाश्ता आता तुमच्या घरी; 5 मिनिटांतच बनवा फ्रेंच टोस्टची रेसिपी

कृती

  • घरच्या घरी स्ट्राबेरी मँगो ओव्हरनाईट ओट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एक बाऊल घ्या
  • या बाऊलमध्ये ओट्स आणि चिया सीड्स टाका
  • आता यात बदामाचे दूध आणि स्ट्रॉबेरी ग्रीक दही घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा
  • यानंतर यात स्ट्रॉबेरी शॉर्टकेक काजू बटर टाका आणि मिक्स करा
  • आता तयार मिश्रणातील अर्धा भाग काचेच्या कंटेनरमध्ये अथवा ग्लासमध्ये टाका
  • पहिला थर लावल्यांनंतर दुसऱ्या थरासाठी यात पिकलेल्या आंब्याचे आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे टाका, हे मिक्स करण्याची गरज नाही
  • मग यावर ओट्सचा उरलेला भाग पसरवा आणि झाकण बंद करा
  • हा कंटेनर अथवा ग्लास रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून द्या
  • रात्रभर भिजवलेले हे ओट्स सर्व फ्लेवर्स चांगले शोषून घेते ज्यामुळे सकाळी एक उत्तम चव प्राप्त होते
  • सकाळी कंटेनर फ्रिजमधून बाहेर काढा आणि यावर पुन्हा एकदा फ्रेश आंबा-स्ट्रॉबेरीचे तुकडे पसरवा
  • सर्व साहित्य हळूवारपणे ढवळा आणि पौष्टिक चवीचा आनंद लूटा

घरबसल्या अशा हेल्दी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या अस्मिता ऑरगॅनिक फार्म्सच्या ऑफिशियल वेब साईटला भेट देऊ शकता. asmitaorganicfarm.com

Web Title: Strawberry mango overnight oats is a perfect healthy and tasty breakfast for summers note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • brekfast
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी
1

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार
2

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार

हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट ‘रताळ्याचे पराठे’, अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी
3

हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट ‘रताळ्याचे पराठे’, अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!
4

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.