Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stroke: स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नव्हे हृदयातही होऊ शकते! सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Stroke: स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे. याशिवाय नियमित व्यायाम करणे, तंबाखू टाळणे आणि हृदयाची नियमित तपासणी करूल हद्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हृदयाचे ठोके अनियमित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2026 | 03:45 PM
स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नव्हे हृदयातही होऊ शकते! सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नव्हे हृदयातही होऊ शकते! सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

पुणे: रात्री कोणतीही शारीरिक तक्रार नसताना झोपलेली व्यक्ती सकाळी उठल्यावर अचानक बोलू शकत नाही, तिचा चेहरा एका बाजूला वाकलेला दिसतो किंवा हातापायांमध्ये कमजोरी जाणवते. अशा परिस्थितीत अनेकांना नेमके काय घडले, हे समजत नाही. मात्र, ही लक्षणे स्ट्रोकची असू शकतात. विशेष म्हणजे, काही वेळा या स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नव्हे, तर हृदयात निर्माण झालेल्या रक्ताच्या गुठळीमुळे होते. झोपेत स्ट्रोक येऊन सकाळी त्याची लक्षणे दिसण्याच्या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘वेक-अप स्ट्रोक’ असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो

पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक आणि न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘स्ट्रोक हा केवळ मेंदूशी संबंधित आजार असल्याचा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात हृदयाच्या काही आजारांमुळेही स्ट्रोकचा धोका वाढतो. अनेकदा या हृदयविकारांची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे सकाळी उठल्यावर स्ट्रोकची लक्षणे आढळली, तरी उपचारासाठी उशीर झाला असे समजू नये. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाला योग्य उपचार मिळू शकतात.’’

हृदयाचे ठोके अनियमित होण्याच्या समस्येला ‘अॅट्रियल फिब्रिलेशन’ असे म्हणतात. या स्थितीत हृदयाच्या वरच्या कप्प्यांमध्ये रक्त साचून गुठळी तयार होऊ शकते. ही गुठळी रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचल्यास रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होऊन स्ट्रोक येऊ शकतो. अॅट्रियल फिब्रिलेशनमुळे स्ट्रोकचा धोका सुमारे पाचपट वाढू शकतो. हृदयाच्या झडपांचे विकार आणि इतर काही हृदयविकारदेखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

वेक-अप स्ट्रोकमध्ये सर्वांत मोठे आव्हान म्हणजे स्ट्रोक नेमका कधी आला, हे समजत नाही. रात्री झोपल्यानंतर सकाळी लक्षणे दिसेपर्यंत किती वेळ गेला, याचा अंदाज बांधणे कठीण असते. मात्र, आधुनिक सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांमुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांची स्थिती आणि मेंदूच्या प्रभावित भागाची माहिती मिळू शकते. त्यानुसार निवडक रुग्णांना रक्ताची गुठळी विरघळवणारी औषधे किंवा ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’द्वारे गुठळी काढण्याचे उपचार करता येतात.

स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी ‘बी फास्ट’ (BE FAST) ही पद्धत उपयुक्त ठरते. अचानक तोल जाणे, दृष्टी धूसर होणे, चेहरा वाकडा होणे, हातात कमजोरी येणे किंवा बोलताना अडचण निर्माण होणे ही स्ट्रोकची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच तातडीने रुग्णवाहिका बोलवून उपचारांची सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, काही वेळाने लक्षणे कमी झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. हा भविष्यातील गंभीर स्ट्रोकचा इशारा असू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅस्पिरिनसारखी औषधे देऊ नयेत. तसेच रुग्णाला खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही देणे टाळावे.

स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखू टाळणे आणि हृदयाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. हृदयाचे ठोके अनियमित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

स्ट्रोक अचानक येत असला, तरी त्यामागील जोखीम अनेकदा आधीपासून अस्तित्वात असते. हृदय आणि मेंदू यांच्यातील संबंध समजून घेणे, लक्षणे वेळीच ओळखणे आणि तातडीने उपचार घेणे यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्याबरोबरच कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोकाही कमी करता येऊ शकतो, असे डॉ. रंजन यांनी स्पष्ट केले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्ट्रोकची सुरुवात हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होऊ शकते का?

    Ans: होय. हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता (Atrial Fibrillation) यांसारख्या समस्यांमुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचल्यास इस्केमिक स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

  • Que: स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास काय करावे?

    Ans: स्ट्रोकची लक्षणे दिसताच तातडीने रुग्णवाहिका बोलवून रुग्णाला रुग्णालयात न्यावे. लक्षणे आपोआप कमी होण्याची वाट पाहू नये. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते.

  • Que: हृदयाच्या कोणत्या आजारांमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो?

    Ans: अॅट्रियल फिब्रिलेशन (अनियमित हृदयाचे ठोके), हृदयविकार आणि हृदयाच्या झडपांशी संबंधित काही समस्या यांमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढू शकतो.

Web Title: Stroke warning signs a stroke can originate in the heart too never ignore these morning symptoms sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • brain stroke
  • Heat Stroke
  • world stroke day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.