टॉयलेट सीटवरील हट्टी डाग क्षणार्धात होतील दूर; वॉशरूम दिसू लागेल नव्यासारखे... फक्त या 3 जादुई ट्रीक्सचा वापर करा
निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयींसोबतच स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्यायला हवी. अनेकदा लोक आपल्या खाण्या-पिण्याकडे, घराच्या स्वछतेकडे तर लक्ष देतात मात्र घरातील एक जागा सर्वांच्या नजेरेतून राहून जाते. ही जागा म्हणजे घरातील टॉयलेट. सर्वात जास्त घाण आणि बॅक्टेरियाज टॉयलेटसीटवर आढळून येतात, अशात वेळोवेळी याची स्वच्छता राखणे फार गरजेचे असते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही ‘ही’ हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी
वॉशरूमच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण वॉशरूममध्ये असलेली टॉयलेट सीट रोगांचे घर आहे, ज्याची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही टॉयलेट सीटवरील हट्टी डाग काही केल्या जात नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला काही घरगुती ट्रिक्सविषयी माहिती सांगत आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील घाण जुने टॉयलेट स्वछ आणि नव्यासारखे बनवू शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर पेस्ट
टॉयलेट सीट साफ कर्नूसाठी तुम्ही बेकिंग सोडा व्हिनेगरचा वापर करू शकता. टॉयलेट सीट्स स्वच्छ करण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग आहे. ही पेस्ट अम्लीय आहे, जी डाग काढून टाकण्यास आणि सीटचे निर्जंतुकीकरण करण्यास मदत करते. यासाठी डाग असलेल्या भागांवर थोडासा बेकिंग सोडा शिंपडा. नंतर बेकिंग सोड्यावर पांढरा व्हिनेगर घाला किंवा स्प्रे करा, एक फिजी पेस्ट तयार करा. पेस्ट कमीतकमी 15-30 मिनिटे किंवा जास्त काळ टॉयलेट सीटवर तशीच राहू द्या. नंतर स्क्रब, ब्रश किंवा स्पंजच्या वापराने टॉयलेट सीट घासून काढा.
लिंबाचा रस आणि मीठ
लिंबाचा रस आम्लयुक्त असतो आणि त्यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, तर मीठ डागांवर कठोर हल्ला करते, ज्यामुळे ते काढणे सोपे होते. अशात या दोघांचे संमिश्र टॉयलेट सीटवरील घाण दूर करण्यास मदत करेल. यासाठी लिंबाचा रस थेट डागांवर पिळून घ्या. मग लिंबाच्या रसावर थोडे मीठ शिंपडा. आता ही पेस्ट 15-20 मिनिटे टॉयलेट सीटवर तशीच राहू द्या. यानंतर ब्रश किंवा स्पंजने डाग घासून काढा आणि मग पाण्याने तो भाग धुवून काढा.
व्हिनेगर
टॉयलेट सीटवरील हट्टी डाग साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. व्हिनेगर आम्लयुक्त आहे, जे त्यांच्या मुळांपासून डाग काढून टाकण्यास मदत करते. यासाठी टॉयलेट सीटवर डाग पडलेल्या भागांवर थेट व्हाइट व्हिनेगर लावा. सुमारे 15-30 मिनिटे याला तसेच राहू द्या. व्हिनेगरच्या अम्लीय स्वभावामुळे डाग दूर होतात. डाग पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी स्क्रब ब्रश किंवा स्पंज वापरा. टॉयलेट सीट स्वच्छ पाण्याने घासून धुवा आणि कमाल बघा.