Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुधागडाचा ऐतिहासिक ‘पूर्व बुरुज’ पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश

ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दिशेने ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांनी महत्त्वाचे पाऊल उचलत सुधागडावरील दुर्लक्षित ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. श्रमदान मोहिमेमुळे हा भाग आता सुरक्षित आणि सुलभ झाला

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 10:44 AM
सुधागडाचा ऐतिहासिक 'पूर्व बुरुज' पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश

सुधागडाचा ऐतिहासिक 'पूर्व बुरुज' पुन्हा पर्यटकांसाठी खुला; ट्रेक क्षितिज संस्थेच्या श्रमदान मोहिमेला यश

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रमदान मोहिमेत सुमारे १ किमीचा झाडीने बंद झालेला मार्ग, काटेरी झुडपे आणि गवत काढून पूर्णपणे मोकळा करण्यात आला.
  • धोकादायक असलेल्या मूळ वाटेला सुरक्षित पर्याय तयार करण्यात आला, ज्यामुळे गडप्रेमी सहज बुरुजपर्यंत पोहचू शकतील.
  • संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचा असलेला पूर्व बुरुज पुन्हा खुला झाल्याने सुधागडाचा ऐतिहासिक ठसा जतन झाला आहे.
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘ट्रेक क्षितिज’ या संस्थेच्या शिलेदारांनी दुर्ग संवर्धनाचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सुधागड दुर्गावरील अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित असलेल्या ‘पूर्व बुरुजा’चा मार्ग आणि परिसर स्वच्छ करण्याची विशेष मोहीम नुकतीच २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या राबवण्यात आली. या मोहिमेमुळे आता गडप्रेमींना या बुरुजापर्यंत पोहोचणे आणि तिथे वावरणे सहज शक्य झाले आहे.

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण

गवत आणि काटेरी झुडपांचे साम्राज्य हटवले:

डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीदरम्यान या बुरुजाकडे जाणारा मार्ग दाट झाडी आणि गवतामुळे पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी केवळ गाईडच्या मदतीनेच तिथे पोहोचता येत होते. हा अडथळा दूर करण्यासाठी ट्रेक क्षितिजच्या टीमने २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मोहिमेला सुरुवात केली. टीममधील सदस्यांनी जिद्दीने काम करत दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे १ किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे साफ केला.

धोकादायक वाटेला सुरक्षित पर्याय :

बुरुजाकडे जाणारी मूळ वाट काही ठिकाणी अत्यंत धोकादायक (Exposed) होती. ट्रेक क्षितिजच्या टीमने श्रमदानातून या वाटेला एक सुरक्षित पर्यायी मार्ग तयार केला आहे, ज्यामुळे ट्रेकर्सचा प्रवास आता सुकर आणि सुरक्षित होणार आहे.

मोहिमेदरम्यान वेळ वाचवण्यासाठी टीमने दुपारचे जेवणही लांबणीवर टाकले. बुरुजावर खाली उतरण्याच्या पायऱ्यांवर साचलेले दगड, गवत आणि काटेरी झुडपे उपसण्याचे काम अत्यंत कष्टदायक होते. मात्र, सलग २ तासांच्या मेहनतीनंतर बुरुजावर उतरण्याचा मार्ग आणि बुरुजाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. आता गडप्रेमी /पर्यटकांना या ऐतिहासिक बुरुजाचे दर्शन जवळून घेता येणार आहे.

पूर्व बुरुजाचे ऐतिहासिक महत्त्व:

सुधागडच्या संरक्षणाच्या दृष्टीने पूर्व बुरुज अत्यंत मोक्याचा मानला जातो. भोरप्याची नाळ किंवा घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना महत्त्वाची होती. जर शत्रूने हा बुरुज जिंकला असता, तर त्यांना थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन होणे ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.

“मांडवीकोटावरील सलग ५ मोहिमांनंतर आम्ही सुधागडचा पूर्व बुरुज मोकळा करण्याचा संकल्प केला होता. आमच्या टीमने दाखवलेल्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. दुर्ग संवर्धनाचे हे कार्य आम्ही पुढेही असेच सुरू ठेवू.” — शुभम सावंत (मोहीम प्रमुख, ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली)

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?

मोहिमेत सहभागी सदस्य :

प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी , शैलजा धनगर, प्रणाली नारकर, सुजल राबांडे, अथर्व गावकर, तृप्ती मांजरेकर, प्राची कोकाटे, सागर रासम, प्रशांत साठे, स्नेहल झोपे, सोनाली मांजरेकर, निकिता पवार.

Web Title: Sudhagads historic sudhagadh fort reopens for tourists shramdaan campaign through trek kshitij sanstha dombivli successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • fort
  • travel news
  • Trekking

संबंधित बातम्या

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण
1

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?
2

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?

कोकोनट आयलंड कुठे आहे माहिती आहे का? निसर्गाने नटलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या
3

कोकोनट आयलंड कुठे आहे माहिती आहे का? निसर्गाने नटलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या

Travel Alert: हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा निसर्गमय सोहळा! शिमला-मनालीत शुभ्र चादरीत लपेटले; पण ‘हे’ 5 मुख्य रस्ते झाले बंद
4

Travel Alert: हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा निसर्गमय सोहळा! शिमला-मनालीत शुभ्र चादरीत लपेटले; पण ‘हे’ 5 मुख्य रस्ते झाले बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.