फोटो सौजन्य: Freepik
विचार करा तुम्ही एखाद्या कार्यक्रमास जाण्यास उत्सुक असतात आणि तितक्यात तुम्हाला दिसते ते तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल. काही जणांसाठी पिंपल्स नॉर्मल असले तरी बहुतेक जणांना या पिंपल्सची चीड येत असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारातील अनेक महागडे क्रीम्स वापरत असतात . इतकंच नाही तर काही लोक वैद्यकीय उपचारांचीही मदत घेतात. पण आता तुम्ही घरगुती उपाय करून तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर बनवू शकता.
सफरचंद फळाचे फायदे आपण सर्वेच जाणतो. सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. सफरचंदाची साल वापरून तुम्ही तुमची त्वचा सुधारू शकता. चला जाणून घेऊया सफरचंदाची साल नेमकी वापरायची तरी कशी.
सफरचंदाच्या सालीचा फेस पॅक तुम्ही घरीच बनवू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी सफरचंदाची साल काही दिवस उन्हात वाळवा व नंतर त्याची पावडर बनवा. आता दोन चमचे सफरचंद पावडर, एक चमचा बारीक पिसलेला दलिया पावडर आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा.
यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुम्ही सफरचंदाच्या सालीपासून दुसऱ्या प्रकारचा फेस पॅकसुद्धा बनवू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे सफरचंदाच्या सालीची पावडर घेऊन त्यात आवश्यकतेनुसार थोडे दूध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर १५ ते २० मिनिटे लावा. त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि के मुबलक प्रमाणात आढळते, जे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास खूप मदत करते. सफरचंदाच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक तुमचा चेहरा मुलायम करतो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी करतो. एवढेच नाही तर सफरचंदाच्या सालीचा वापर करून तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळेही दूर करू शकता.